Pune News | अ‍ॅड. मधुकर वाघमारे लिखित ‘मधुपुष्प’चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न ! अविनाश महातेकर म्हणाले – ‘आत्मचरित्र हे सामाजिक दस्तावेज असतात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी चळवळ वाढवताना केलेल्या संघर्षाचा आलेख आत्मचरित्रे स्पष्ट करतात. ती व्यक्तिगत असली तरी सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक घडामोडींचा वेध त्यातून घेता येतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मचरित्राचे लेखन करावे. कार्यकर्त्यांची चळवळीप्रति असलेली निष्ठा, त्याग आणि संघर्षामुळे दलित व वंचितांना न्याय मिळू लागला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री अविनाश महातेकर (Avinash Mahatekar) यांनी केले. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अ‍ॅड. मधुकर वाघमारे (Adv. Madhukar Waghmare) लिखित व यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित मधुपुष्प या आत्मचरित्राचा प्रकाशनसोहळा आणि स्नेहमेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. (Pune News)

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड (Adv. Jaidev Gaikwad) होते. यावेळी पोलिस कमिशनर अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, नगरसेवक अ‍ॅड. अविनाश साळवे, मुरलीधर जाधव, राजेंद्र ओव्हाळ, वसंत साळवे, अरुण खोरे, गुलाब गजरमल, रूपाली अवचरे, शहाजी शिंदे आदी वक्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करून आंबेडकरी चळवळीतील आधारवड असलेल्या मधुकर वाघमारे यांना त्यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेविका लता राजगुरू, बाळासाहेब जानराव, अशोक पगारे, के. बी. मोटघरे, हनुमंत साठे, अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. (Pune News)

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) यांनी केले. यात त्यांनी आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या संदेशाचा भाऊसाहेबांनी केलेला स्वीकार व विचार-चळवळीचा आईकडून घेतलेला वसा व वारसा याबद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन गौरव वाघमारे, डॉ. प्रज्ञा वाघमारे, मैत्रेय वाघमारे, प्रमोद वाघमारे, प्रकाशक निखिल लंभाते यांनी केले.

 

यावेळी अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. गायकवाड म्हणाले की बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे स्त्रियांना समानतेचा अधिकार मिळाला. आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आत्मचरित्र लिहिले पाहिजे. जीवनामध्ये केलेल्या वाटचालीचा गंभीरपणे पुनर्विचार केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर अरुण खोरे यांनी आंबेडकरांनी जनतेला लिहीत राहण्याचा संदेश दिला असून वाघमारे यांनी त्यांचे अनुकरण केले असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title :- Pune News | Autobiographies are social documents – Avinash Mahatekar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांवर मिळतो सर्वात जास्त रिटर्न; काही वर्षात पैसे होतात ‘दुप्पट’

Ration Card Update | रेशन कार्डात करायचा असेल पत्नीच्या नावाचा समावेश तर काय करावे, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Parambir Singh Suspended | IPS परमबीर सिंह निलंबीत ! मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांवर अशा प्रकारच्या कारवाईची पहिलीच वेळ