Pune News : सिंहगड रोड परिसरातील आयुर्वेदिक डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील सिंहगड रोड परिसरात आयुर्वेदिक डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहली आहे. त्यात व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने हे पाऊल उचल्याचे म्हटले आहे. रूपेश सुरेश पाटील (वय ३१, रा. शार्विल सोसायटी, धायरी) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे आयुर्वेदिक डॉक्टर होते. ते शार्विल सोसायटीच्या आठव्या मजल्यावर राहत होते. लॉकडाउनच्या अगोदर त्यांची आई व पत्नी हे गुजरात येथे उपचारासाठी गेले होते. त्यांना शुगरचा आजार होता. गेल्या काही महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. १९ डिसेंबर रोजी रात्री त्यांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाटील यांनी त्यांचा दरवाजा न उडल्यामुळे शेजाऱ्यांनी संशय आला. त्यांनी डॉक्टरांच्या नातेवाईकांना बोलविले. त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना दिली. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. त्यात आर्थिक व मानसिक कारणामुळे आत्महत्या करत आहे. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे. धायरी येथे त्यांचे क्लिनिक होते. पण, ते व्यवस्थित चालत नव्हते. त्यांनी लॉकडाउनच्या अगोदर काही दिवसच इव्हेन्ट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्याने या व्यवसायात नुकसान झाले आणि तो बंद झाला. यामध्ये त्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्याबरोबरच त्यांना शुगरचा त्रास सुरू होता. यातून ते नैराश्यात गेले. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केल आहे.