Pune News | पुण्यात बांगलादेशींची घुसखोरी ! मिलिटरी इंटेलिजन्सने दिली पुणे पोलिसांना माहिती, चौकशी सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही बांगलादेशी नागरिक (Bangladeshi citizens) मागील 16 वर्षापासून पुण्यातील (Pune News) हडपसर परिसरात वास्तव्याला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशी नागरिक हडपसर पोलीस स्टेशनच्या (Hadapsar Police Station) हद्दीत रहात असल्याची माहिती मिलिटरी इंटेलिजन्सने (Military Intelligence) हडपसर पोलिसांना दिली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिलिटरी इंटेलिजन्सने पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. बांगलादेशी नागरिक 1995 ते 2011 दरम्यान बांगलादेशातून पुण्यात (Pune News) आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्यात आल्यानंतर त्यांनी आधार (Aadhar card) आणि पॅन कार्ड (PAN card) बनवून घेतले. पोलिसांनी संशयितांचं बांगलादेशी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अद्याप कोणतीही कागदपत्रे जप्त केलेली नाहीत. त्यामुळे अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. प्राप्त माहितीच्या आधारे बेकायदेशीरपणे भारतात स्थलांतरित झालेल्या आणि सध्या पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या संशयित सात व्यक्तींना नुकतेच चौकशीसाठी हडपसर पोलीस ठाण्यात आणले होते.

CoWIN | औरंगाबादमध्ये कोविन अ‍ॅप हॅक? महापालिकेची पोलिसात तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार दिलावर मंडल, एसए शेख, फारुख शेख, एनआर शेख, कामरुल मंडल, मुनीर शेख, हुमांयू शेख अशी या लोकांची नावे आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये ते बांगलादेशी असल्याचे समोर आले. हे लोक 1995,2002,2007,2008 आणि 2011 मध्ये कोलकता (Kolkata) मार्गे भारतात आले आणि पुण्यात पोहचले. सध्या हे लोक मंतरवाडी कचरा डेपोमध्ये रॅग पिकर्स म्हणून काम करत आहेत. पुण्यात आल्यानंतर या लोकांनी त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कर्ड अशी भारतीय कागदपत्रे तयार करुन घेतल्याचे चौकशीत उघड झाले आहेत. त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे अद्याप जप्त करण्यात आले नाहीत. त्यामुळे ते बांगलादेशी आहेत की भारतीय हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या लोकांकडून बांगलादेशी असल्याची कागदपत्रे जप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या या संशयित लोकांना हडपसर येथील वकील अस्लम सय्यद (Lawyer Aslam Sayyed) यांच्याकडे सोडण्यात आले आहे. त्यांनी पोलीस चौकशीसाठी आवश्यक असेल तेव्हा त्यांना सादर करण्याची जबाबदारी स्विकारली आहे.

अस्लम सय्यद यांनी सांगितले की, हे संशयित अनेक वर्षापासून याठिकाणी राहत आहेत. त्यांनी
याठिकाणीच लग्न केले आणि त्यांना मुलंबाळ देखील आहेत. पोलिसांनी त्यांना बोलावल्यानंतर
त्यांनी त्यांचे आधार आणि पॅन कार्ड, लग्नाचे प्रमाणपत्र आणि मुलांच्या जन्माचे प्रमाणपत्र सादर केले
आहे. यापैकी काही जणांनी पुण्यात जमीन देखील खरेदी केली असून त्याची कागदपत्रे पोलिसांकडे
सादर केली आहेत. हे लोक पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करती आहेत. या बांगलादेशींबाबत मिलिटरी इंटेलिजन्सने (Military Intelligence) हडपसर पोलिसांना दिली होती.

हे देखील वाचा

MP Supriya Sule | महाआघाडीतील सर्व नेत्यांना टार्गेट केलं जातंय – सुप्रिया सुळे

WhatsApp आणणार ट्विटर, इन्स्टाग्राम आणि सिंगल अ‍ॅपसारखं खास फीचर !

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Bangladeshi infiltration in Pune! Military intelligence gives information to Pune police, investigation begins

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update