Pune News : पार्कींग करण्याच्या वादातून बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकाला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  वाहन पार्कींग करण्याच्या वादातून बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकाला धक्काबुक्की केल्याची घटना लष्कर परिसरात घडली. तर मध्ये आलेल्या बँक कर्मचार्‍याला देखील मारहाण करून त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केली आहे.

चेतन पारेख, भुषण पटील, बिराजदार यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमोह रोशन मुद्रिका प्रसाद श्रीवास्तव (वय 42, रा. फुरसुंगी) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीवास्तव हे बँक ऑफ बडाेदाचे व्यवस्थापक आहेत. पुणे-साेलापूर रस्त्यावर आईसलॅंड पार्क याठिकाणी त्यांची बॅंक आहे. तसेच जवळच अरिहंत काॅलेज आहे. मागील काही दिवसांपासून अरिहंत कॉलेजच्या कर्मचार्‍यामध्ये वारंवार पार्कींगच्या वादातून बॅंक कर्मचाऱ्यांची भांडणे होत हाेती. याच कारणावरून शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पुन्हा वाद झाले. यावेळी चौघांनी श्रीवास्तव यांना धक्काबुक्की केली. तसेच बँकेचे कर्मचारी पांडुरंग गिड्डे यांना हाताने मारहाण करून त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर करण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक एस. महाडिक करत आहेत.