Pune News : अल्पसंख्य समाजाचे प्रश्न भारतीय जनता पक्ष सोडवेल – चंद्रकांत पाटील

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ज्यू अल्पसंख्य समुदायाचे राज्यातील प्रमुख डॉ डॅनियल पेणकरआणि पदाधिकाऱ्यांनी शनीवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपा पुणे शहर अल्पसंख्य आघाडीचे अध्यक्ष अली दारूवाला यांच्या विशेष प्रयत्नाने हा प्रवेश लाल देऊळ सिनेगॉग येथे पार पडला. भाजपा अल्पसंख्य आघाडी प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख ,शहराध्यक्ष जगदीश मुळीक , सरचिटणीस राजेश पांडे,पालिका सभागृह नेते गणेश बीडकर उपस्थित होते.

भाजपा अल्पसंख्य आघाडीचे शहराध्यक्ष अली दारूवाला यांनी स्वागत , प्रास्ताविक केले.
डेविड ससून ट्रस्ट चे प्रमुख सॉलोमन सोफेर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ भारतीय जनता पक्ष हा देशातील, जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. देशात भाजपाचे राज्य आहे. अशा पक्षा सोबत ज्यू समुदायाचे नाते जोडले जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.पक्षाची सदस्य संख्या, जनाधार सतत वाढत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मागील
मताधिक्याचा विक्रम तोडला जाईल याची खात्री अशा कार्यक्रमांमधून होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , भाजपाशी ज्यू समुदाय सतत संबंधित राहिला आहे. आता प्रत्यक्ष कार्यरत होत आहे, ही आनंदाची बाब आहे. अल्पसंख्य समाजाचे प्रश्न भारतीय जनता पक्ष सोडवेल .

सॉलोमन सोफेर म्हणाले ‘ नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताची वेगवान प्रगती झाली.आम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलो तरी या प्रयत्नांबद्दल आम्हाला आस्था आहे. डॉ. डॅनियल पेणकर म्हणाले, ‘ ज्यू अल्पसंख्य समुदायाला प्रथमच कोणीतरी राजकीय पक्षाने मुख्य प्रवाहात येण्याचे निमंत्रण दिले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.

जगदीश मुळीक म्हणाले, ‘ लाल देऊळ सारख्या पवित्र वास्तूत होत असलेला हा कार्यक्रम महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्ष सदैव ज्यू समुदायासमवेत राहील.