Pune News | पॅराऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या भाविना पटेलचा सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पॅराऑलिम्पिक 2020 (Paralympic 2020) या जागतिक क्रिडा स्पर्धेत टेबल टेनिस (Table tennis) या खेळात भारताला रौप्यपदक मिळवून दिलेल्या भाविना पटेल (Bhavina Patel) यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यातील ढोले पाटील रोडवरील देसाई हाऊसमध्ये कार्यक्रमात भाविना पटेल यांचा आज (रविवार) सत्कार करण्यात (Pune News) आला.

 

देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल केल्या बद्दल पूना गुजराती बंधू समाज (Poona Gujarati Bandhu Samaj) व पूना गुजराती केळवणी मंडळ (Gujarati Kelvani Mandal) यांच्या वतीने भाविना पटेल (Bhavina Patel) यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पूना गुजराती बंधू समाज तर्फे मॅनेजिंग ट्रस्टी राजेश शहा (Rajesh Shah) यांनी तर पूना गुजराती केळवणी मंडळाच्या वतीने अध्यक्ष किरीट शहा (Kirit Shah) यांनी भाविना पटेल यांचा सत्कार (Pune News) केला.

 

भाविना पटेल यांनी टोकियो येथे झालेल्या पॅराऑलिम्पिक 2020 या स्पर्धेत भारता साठी रौप्य पदक मिळविले आहे.
सदर सत्कार कार्यक्रमात पटेल म्हणाल्या की, माझे दोन स्वप्न आहेत एक म्हणजे 2024 च्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी सुवर्ण पदक जिंकणे,
आणि दुसरे म्हणजे आपल्या देशात कोणीही अपंग व अंध होऊ नये.

राजेश शहा यांची महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ या संस्थेच्या महा सचिव पदावर निवड झाल्याबद्दल भाविना पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सुरतवाला (Ashok Suratwala) यांनी केले तर आभार प्रदर्शन त्रिलोक कामदार यांनी केले.
या प्रसंगी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune News | Bhavina Patel felicitated for helping India win a silver medal in the Paralympics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cyber Crime | फसवणूकीचा नवा फंडा ! पैसे पाठविल्याचा WhatsApp वरील बनावट Paytm मेसेज दाखवून फसवणूक

Aryan Khan Drugs Case | ‘किंग’ खान ‘शाहरूख’कडे 25 कोटींची मागणी ! 18 कोटींवर डील झाली; NCB च्या वानखेडेंना 8 कोटी द्यायचे असं बोलणं सुरु होतं, ‘त्या’ बॉडिगार्डचा दावा

Pune Crime | आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दि पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम सोसायटीचे माजी अध्यक्ष नागेश नलावडे यांच्यासह 23 संचालकांवर FIR