Pune News | मंदिरे उघडण्यासाठी भाजप पुन्हा आक्रमक ! कसबा गणपतीसमोर शंखनाद, राज्यात सर्वत्र आंदोलन (व्हिडीओ)

पुणे : Pune News | एका बाजूला केंद्र सरकार कोरोना काळात काळजी घेण्याचा इशारा देत आहे. राज्य सरकार रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार करीत असतानाच राज्यात विरोधी पक्ष असलेला भाजप मंदिरे उघडण्यासाठी पुन्हा एका आक्रमक झाला आहे. भाजपने आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन (BJP Protest) पुकारले आहे. पुण्यातील कसबा गणपतीसमोर (kasba ganpati) सकाळी शंखनाद करुन या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.. भाजप अध्यात्मिक आघाडी हे आंदोलन करत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil), शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP Pune city president Jagdish Mulik) यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यातील मंदिरे 1 वर्षाहून अधिक काळ बंद आहेत. सर्व काही व्यवहार सुरु झाले़ मग मंदिरेच बंद का, केवळ मंदिरांमुळे कोरोना वाढतो का? असा सवाल अध्यात्मिक आघाडीने राज्य सरकारला केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी पुण्यात महाराष्ट्रात गोपाळकाला, त्यानंतर गणेशोत्सव असे मोठे सण येत आहे. या काळात लोकांनी काळजी घेतली नाही तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा दिला आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक 3.06 टक्के पॉझिटिव्हिटी रेट झाला आहे. या आठवड्यात हीच परिस्थिती राहिली तर व पॉझिटिव्हीटी रेट 3 टक्क्यांच्या पुढे गेला तर पुण्यात पुन्हा निर्बंध लावावे लागण्याची शक्यता आहे.

आंदोलनाच्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकले, पुण्यातील घटना

Free Wi-Fi | खुशखबर ! राज्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये मोफत ‘वाय-फाय’ कनेक्शन, विद्यार्थ्यांना मिळेल सुविधा

Indian Railways, IRCTC | डुप्लीकेट तिकिटाची मागणी केव्हा करता येते? जाणून घ्या पद्धत

Auto Debit Payment System | 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम होत आहे लागू, बँक अकाऊंटमध्ये मोबाइल नंबर करून घ्या अपडेट; जाणून घ्या ADPS बाबत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | BJP aggressive again to open temples! Shankhanad in front of Kasba Ganapati, agitation all over the state (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update