Pune News | भाजप शहरअध्यक्ष व पदाधिकार्‍यांना छत्रपती संभाजी महाराजांच्याच नावाचा विसर?

उड्डाणपूलाच्या जाहिरातींमधून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेखच गाळल्याने चर्चेला तोंड फुटले

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | छत्रपती संभाजी महाराजांची ‘धर्मवीर’ ही उपाधी कोणी पुसू शकले नाही आणि पुसू शकणार नाही, या शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका करणारे (Pune BJP News) भाजपचे शहरअध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनाच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा विसर पडल्याचे समोर आले आहे. (Pune News)

 

महापालिकेच्यावतीने येरवडा येथील गोल्फ क्लब चौकात उड्डाणपुल उभारण्यात आला आहे. या पुलाचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल असे करण्यात आले आहे. विशेष असे की, महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असतानाच हा पूल मंजूर करण्यात आला असून नाव समितीतही ‘धर्मवीर’ अशी उपसूचना देउन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल असा ठराव करण्यात आला आहे. विशेष असे की आज उड्डाणपूलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन होेते. (Pune News)

प्रत्यक्षात मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे दौरा रद्द केल्याने फडणवीस यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आले. शहर भाजपच्यावतीने शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासह अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ, खडकी कॅन्टोंन्मेंट हद्दीतील जुन्या पुणे मुंबई रस्त्याचे रुंदीकरण व बी.आर.टी.मार्गाचे भूमिपूजन, बावधन येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजनाची जाहिरात माध्यमांमध्ये दिली आहे. या जाहिरातीमध्ये उड्डाणपूलाचे नावच छापण्यात आलेले नाही. त्यामुळे एकीकडे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच असल्याची भुमिका मांडताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निषेधार्थ आंदोलन करणार्‍या भाजप शहरअध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना छत्रपती संभाजी राजांच्या नावाचाच विसर पडला काय? यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

 

Web Title :- Pune News | BJP city president and officials forget the name of Chhatrapati Sambhaji Maharaj?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा