Pune News | भाजपच्या महिला नगरसेविकांना ‘एकाधिकारशाही’चा असाही फटका ! महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपी संचालक पदाच्या दावेदार ‘तापकीर’ यांची ‘पक्ष उपाध्यक्ष ‘ पदावर ‘बोळवण’

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | शहर भारतीय जनता पार्टीतील ‘एकाधिकारशाही’ वागणुकीची एकापाठोपाठ एक उदाहरणे समोर येवू लागली आहेत. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि पीएमपी संचालक पदाच्या प्रमुख दावेदार ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर (varsha tapkir)
यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने पुण्यात (Pune News) महिला कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस सुरु झाली आहे.

धनकवडी (Dhankawadi) सारख्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यातुन सलग 4 वेळा पुणे महापालिकेत (pune corporation) भाजपचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वर्षा तापकिर (varsha tapkir) या 2017 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महापौर पदाच्या दावेदार होत्या. परंतु भाजपने पहिल्या वर्षी मुक्ता टिळक (mukta tilak) यांना या पदावर संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रा प्रमाणे किमान सव्वा वर्ष महापौर पदी संधी मिळेल अशी तापकीर यांची अपेक्षा होती. मात्र टिळक यांनाच अडीच वर्षाचा कालावधी देण्यात आला.

यानंतर पाच वर्षामध्ये किमान भाजप कडून महिलांना एक वर्ष स्थायी समिती अध्यक्ष पदी संधी देण्यात येईल,
त्यामध्ये तापकीर यांची वर्णी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.
परंतु शेवटच्या वर्षी देखील हेमंत रासने (hemant rasane) यांनाच दुसऱ्यांदा संधी देण्यात आल्याने तापकीर यांचा हिरमोड झाला.
यामुळे नाराज झालेल्या तापकीर यांची मनधरणी करण्यासाठी पीएमपीएमएलचे (PMPML) संचालक पद देण्याचे पक्षाने मान्य केले.

पक्षाने त्यानुसार संचालक शंकर पवार (shankar pawar) यांचा राजीनामा देखील घेतला. परंतु राजीनामा स्वीकारन्यावरून पक्षात दोन गट पडले. यावरून पदाधिकाऱ्यामध्ये खटके उडाले. पीएमपी मध्ये ठेकेदारी पद्धतीने बस चालवणाऱ्या ठेकेदार कंपन्यांचा ‘कोट्यवधी’  रूपयांचा दंड ‘माफ’ करण्याचा आणि बसेस ‘ खरेदीचा विषय’ मार्गी लागल्यानंतर नुकतेच शंकर पवार यांचा राजीनामा स्विकारण्यात आला. किमान आतातरी तापकीर यांना संचालकपदी संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु ती देखील संधी हिरावून घेत संजय काकडे (sanjay kakde) यांच्या गटाची नाराजी नको म्हणून प्रकाश ढोरे (prakash dhore) यांना संचालक पदी नेमण्यात आले.

या घडेमोडी नंतर अवघ्या चारच दिवसांत वर्षा तापकीर यांना पक्षाने ‘प्रदेश उपाध्यक्षपदी’ नियुक्त करत ‘बोळवण’ केली आहे.
लोकांमधुन निवडून येणाऱ्या महिलांना सत्तेत महत्वाचा वाटा देण्यात राज्यात जशी भाजपला ‘अँलर्जी’ तशीच ‘अँलर्जी’ पालिकेत ही आहे.
कोथरुडच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतः घेतले असे बोलले जाते.
प्रा. कुलकर्णी यांना पदवीधर मतदार संघातुन उमेदवारी मिळेल अशी अटकळ होती.
परंतु त्यांची ‘बोळवण’ पक्षाच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षपदी केली.
आता ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर यांनाही भाजप प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमून आणखी एक महिला कार्यकर्ती बाजूला काढली अशी चर्चा आहे.
पंकजा मुंडे, प्रितम मुंडे यांची परिस्थिती सर्वांना माहित आहे.

वर्षानुवर्षे पक्षात काम करणाऱ्या महिलांना फक्त गर्दीसाठी संधी दिली जातीय. पुणे महापालिकेत (pune corporation) भाजपच्या महिला नगरसेवकांची संख्या पुरुष नागरसेवकंपेक्षा 2 ने अधिक आहे. यापैकी एक वगळता सर्वच नगरसेविका या महिलांसाठीच्या आरक्षित जागेवर निवडून आल्या आहेत. मात्र, बैठकांमध्ये व निर्णय प्रक्रियेमध्ये केवळ बहुमत सिद्ध करण्यासाठी ‘हात उंचावणे’ एवढेच काय ते काम त्यांना करावे लागत आहे. त्यामुळेच अनेक महिला सदस्यांना सभागृहात अथवा स्थायी समितीच्या बैठिकीत अपवादानेच बोलायची  संधी मिळाली आहे. बहुतांश महिलांचे पतीदेवच पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच कामे घेवून ‘तिष्ठत’ बसल्याचे दिसतात. केवळ ‘सेवा कार्यावर’ लाखो रुपये खर्च करू शकणाऱ्यानाच पक्षात ‘एंटरटेन’ केले जाते अशी चर्चा आता दबक्या आवाजात होत आहे.

यामुळे नगरसेविका होवूनही संधी मिळत नसल्याने भाजपच्या महिला नगरसेविकांमध्ये खदखद वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title : Pune News | bjp corporator varsha tapik appointed as a maharashtra state vice president

Coronavirus | कोरोनापासून बचाव करायचा आहे का? शरीरात होऊ देऊ नका ‘या’ 4 व्हिटॅमिनची कमतरता