Pune News | इतिहासाची मोडतोड करून पंडीत नेहरूंच्या परराष्ट्र धोरणांवर टीका करणार्‍या भाजप नेतृत्वाने चीन गिळंकृत करत असलेले ‘भोलेनाथा’चे कैलास वाचवावे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांचा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | परराष्ट्र सेवेत सचिव राहीलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे जाणीवपूर्वक या सरकारचे दहा वर्षातील अपयश लपविण्यासाठी अर्धवट आणि मोडतोड केलेला इतिहास सांगून काँग्रेसची बदनामी करत आहेत. त्यांच्या भुमिकेचा आम्ही निषेध करत आहोत. याउलट दहा वर्षात शेजारील नेपाळ, श्रीलंका, मालदीव सारखे देश आपल्यापासून दूर का गेले? हे जयशंकर यांनी जाहीरपणे सांगावे. तसेच भोलेनाथचा कैलास पर्वत चीनपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas Pawar) यांनी केले आहे.(Pune News)

शुक्रवारी पुणे दौर्‍यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने राबविलेल्या परराष्ट्रीय धोरणांवर आगपाखड करताना तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंवर टीका केली होती. उल्हास पवार यांनी काँग्रेस भवन येथे शनिवारी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत या टीकेचा समाचार घेताना स्वातंत्र्य लढ्यापासूनच देशविरोधी भुमिका घेणार्‍या राष्ट्रीय स्वंयसेवक संघ कायमच दीशाभूल करणारी माहिती सांगून कॉंग्रेसची बदनामी करत असल्याचा पलटवार पवार यांनी यावेळी केला. याप्रसंगी कॉंग्रेसचे प्रदेश पदाधिकारी मोहन जोशी (Mohan Joshi Congress), ऍड. अभय छाजेड (Adv Abhay Chhajed) उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)

उल्हास पवार म्हणाले, दुसर्‍या युद्धानंतर अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश साम्राज्य विस्तारासाठी झपाटले होते. साम्राज्यवादापासून दूर असलेल्या भारतासह जगातील शंभरहून अधिक देशांनी अलिप्त राहाण्याचे धोरण स्वीकारले ते आजही कायम आहे. स्वातंत्र्यानंतर अमेरिकेने आणि नंतर रशियाने भारताला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याची ऑफर दिली होती, मात्र नेहरूंनी त्याला नकार दिला, असा खोटा प्रचार आरएसएस कडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहमीच करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये एखाद्या देशाला सदस्यत्व देताना राष्ट्रसंघातील सर्व देशांचा पाठींबा असावा लागतो. त्यामुळे नेहरूंनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही म्हणणे हा तद्दन भंपकपणा आहे. हा इतिहास परराष्ट्र सचिव राहीलेल्या एस.जयशंकर यांना माहिती आहे. परंतू मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर ते देखिल इतिहासाची तोडफोड करून काँग्रेसची बदनामी करत आहेत.

भाजपचे मागील दहा वर्षातील अपयश लपवण्यासाठी केवळ कोणाला तरी बदनाम करण्यासाठी विशेषतः नेहरू यांना बदनाम केले जात आहे. स्वातंत्र्य लढयात विरोधी भूमिका घेणारे आरएसएस हा देशविरोधी आणि स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणार्‍या कॉंग्रेस नेत्यांवर आरोप, बदनामी करत आहे. उलट मागील दहा वर्षात नेपाळ सारखा शेजारी देश आपल्या विरोधात गेला. मालदीव दूर गेला. श्रीलंकेच्या लगतच्या बेटाचा विषय सत्तेतील दहा वर्षानंतर कसा येतोय? चीन ने ४० हजार चौ. की.मी. गिळंकृत केल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक सांगत आहेत. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी सांगत आहेत. चीन गिळंकृत करत असलेले भोलेनाथाचे कैलास वाचवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत. यावर मात्र भाजपचे नेते आणि परराष्ट्र मंत्री अवाक्षर काढत नाहीत. भाजपची पायाखालची वाळू सरकली असल्याने ते दिशाभूल केले जात असल्याचा आरोप उल्हास पवार यांनी केला.

‘मै भी अण्णा तू भी अण्णा’ पासून ‘मै भी कंगणा तू भी कंगणा’ पर्यंत भाजपची अधोगती

देशाच्या स्वातंत्र्यात काडीमात्र योगदान नसलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने स्वातंत्र्य लढयापासून आतापर्यंत देशाला अडचणीत आणण्याचेच काम केले आहे. २०१४ ला ‘मै भी अण्णा तू भी अण्णा’ पासून सुरू झालेल्या भाजपच्या आलेखाची मै भी कंगणा तू भी कंगणापर्यंत अधोगती झाली आहे. सर्वसामान्य भारतीय जनता या निवडणुकीत भाजपाला आस्मान दाखविल्याशिवाय राहाणार नाही, असा टोलाही उल्हास पवार यांनी यावेळी लगावला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Raid On Spa Center In Sangvi | सांगवी येथे स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका (Video)

Raj Thackeray On Vasant More | वसंत मोरेंबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरे यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले… (Video)