Pune News | कष्टकरी घरगुती कामगार महिलांच्या थकलेल्या भत्त्याचे पैसे राज्य शासनाने त्वरीत वितरीत करावेत – भाजपा महिला मोर्चाची मागणी

पुणे (Pune News) : Pune News |राज्य शासनाने (State Government) कोरोना काळात घरगुती कामे करणाऱ्या महिलांना तातडीची मदत म्हणून १५०० रुपये देण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेचा लाभ मिळू शकणाऱ्या लाभार्थ्यांनी सर्व अटी व निकषांची पुर्तता करुन विविध माध्यमांद्वारे आपले अर्ज दाखल केले आहेत. तरी देखील त्यांना शासनाकडून अद्यापही हा निधी मिळालेला नाही अथवा याबाबत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

याबाबत बऱ्याच घरगुती कामगार महिला (women domestic workers) भगिनींच्या आणी विशेषत: कोथरुड विधानसभा मतदारसंघातील (Kothrud Assembly Constituency) रहिवासी असणाऱ्या महिला भगिनींकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी (BJP) महिला मोर्चा कोथरुड मतदारसंघातर्फे या विषयासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी डॅा. जयश्री कटारे व पुण्याचे महापौर मुरलीधरअण्णा मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी मनपा शिक्षण समिती अध्यक्षा नगरसेवक मंजुश्री खर्डेकर, पुणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस कांचन कुंबरे, कोथरुड महिला मोर्चा सरचिटणीस गायत्री काळभोर, उपाध्यक्षा पल्लवी गाडगीळ, जयश्री तलेसरा, सुप्रिया माझीरे, चिटणीस रमा डांगे, सोशल मिडीया प्रमुख कल्याणी खर्डेकर आदी उपस्थित होते.

हर्षदा फरांदे
अध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा-कोथरुड मतदारसंघ.
संपर्क :- 9730223355

हे देखील वाचा

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र पूर्णपणे Unlock नाहीच

PM kisan | शेतकर्‍यांना आता दरवर्षी 6000 च्या ठिकाणी मिळतील 36000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | BJP Mahila Morcha demands immediate disbursement of tired allowance to women domestic workers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update