Pune News : भाजप महिला मोर्चा शिक्षक शहराध्यक्षपदी स्वाती सावंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर भाजपाची कार्यकारिणी शहर कार्यालय याठिकाणी जाहीर करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शिक्षक शहराध्यक्षपदी स्वाती संजय सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख कार्यकारीणी, मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस तसेच आघाड्यांचे संयोजक व सहसंयोजक, शहर व जिल्हा कार्यकारणी सदस्य, विशेष निमंत्रित यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

याप्रसंगी पुण्यनगरीचे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, उपाध्यक्ष धनंजय जाधव, उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा प्रणिती चिखलीकर, तसेच पुणे शहर संपुर्ण कमिटी, महिला मोर्चा अध्यक्षा स्थायी समिती सदस्य अर्चनाताई पाटील, वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष संतोष खांदवे, पुणे शहराचे सर्वच विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उपस्थित होते.

भाजप महिला मोर्चा शिक्षक शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर स्वाती सावंत म्हणाल्या की, सर्वाना विश्वास देऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोविण्यासाठी प्रथम काम असणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला शिक्षकांचे संघटन करणार आहे. सर्व शिक्षकांच्या समस्या व सुविधासाठी सरकारकडुन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.