Pune News : भाजपा पुणे शहर व्यापारी आघाडीचा पदग्रहण समारंभ संपन्न; चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘कोरोना काळात व्यापारी योद्ध्याप्रमाणे लढला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना काळात व्यापाऱ्यांनी निस्वार्थीपणे काम केले. नागरिकांना मदत केली. व्यापारी हा कोरोना योद्धाच आहे. व्यापाऱ्यांच्या हितासाठी भाजप व्यापारी आघाडीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी तत्पर राहून करावे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच केंद्रातील मोदी सरकार देशातील व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी अनेक चांगले निर्णय घेत असल्याचेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर व्यापारी आघाडीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप व्यापारी आघाडी महाराष्ट्रचे अध्यक्ष विनोद काकाणी, पुणे शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, श्रीपाद ढेकणे, गणेश घोष, दीपक नागपुरे, संदीप लोणकर, धनंजय जाधव, ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप व्यापारी आघाडीला भाजपचे सर्व वरिष्ठ नेते मदत करतील. राज्य व केंद्र स्तरावर व्यापाऱ्यांना सहकार्य करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले.

भाजप पुणे शहर व्यापारी आघाडीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये सर्वांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न झाला असून व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करण्यास आम्ही कटीबद्द असल्याचे पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष महेंद्र व्यास यांनी सांगितले. नवनिर्वाचित भाजप पुणे शहर व्यापारी आघाडीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, – रवींद्र सारुक (सरचिटणीस, कोथरुड विधानसभा), नवनाथ सोमसे (सरचिटणीस, पर्वती विधानसभा), अमर देशपांडे (सरचिटणीस खडकी विधानसभा), संजय गावडे (सरचिटणीस, पर्वती विधानसभा), शिरीष देशपांडे (सरचिटणीस, पर्वती विधानसभा), कल्पेश ओसवाल (सरचिटणीस), बाळासाहेब डांगी (सरचिटणीस, पाषाण), संजीव फडतरे (मीडिया प्रभारी), अजित चंगेडिया (वरिष्ठ उपाध्यक्ष, खडकवसला विधानसभा), विजय नरेला (वरिष्ठ उपाध्यक्ष, वडगाव शेरी विधानसभा), मिठालाल जैन (वरिष्ठ उपाध्यक्ष, कसबा विधानसभा), सोमाराम राठोड ( वरिष्ठ उपाध्यक्ष, शिवाजीनगर विधानसभा), केदार डांगे ( वरिष्ठ उपाध्यक्ष, कसबा विधानसभा) संदीप बेलदरे पाटील (वरिष्ठ उपाध्याक्ष, आंबेगाव विधानसभा), मुकुंद नगरकर (वरिष्ठ उपाध्यक्ष, शिवाजीनगर विधानसभा), विमल संघवी (वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे शहर विधानसभा), सुनिल प्रसाद (उपाध्यक्ष, वडगाव शेरी विधानसभा), अभिषेक देशमुख (उपाध्यक्ष, आंबेगाव विधानसभा), युवराज शर्मा (उपाध्यक्ष, सिंहगड रस्ता विधानसभा), प्रकाश शर्मा (उपाध्यक्ष, पर्वती विधानसभा), शशिकांत डांगी (उपाध्यक्ष, शिवाजीनगर विधानसभा), संजय मुनोत (उपाध्यक्ष, शिवाजीनगर विधानसभा), महेंद्र बनसाल (उपाध्यक्ष, वडगाव शेरी), सुनिल डोंगरे (उपाध्यक्ष, पर्वती विधानसभा), बाबूलाल चौधरी (उपाध्यक्ष, कसबा पेठ विधानसभा), अविनाश जगताप (उपाध्यक्ष, पर्वती विधानसभा), केतन आडिया (उपाध्यक्ष, कोथरूड विधानसभा), होताराम प्रजापती (उपाध्यक्ष, पर्वती विधानसभा), शिवाजी भागवत (उपाध्यक्ष), रामेश्वर वाघमारे (उपाध्यक्ष), योगेश घोडके (उपाध्यक्ष), दिनेश बोराना (उपाध्यक्ष), अली दारुवाला (उपाध्यक्ष), जवाहर तिवारी (कोशाध्यक्ष, कोथरुड विधानसभा), विजयकुमार उणेचा (चिटणीस, भूगाव विधानसभा), अनिकेत जैन (चिटणीस, खडकवासला विधानसभा), प्रियांका बोस (चिटणीस, वडगाव शेरी विधानसभा), पुरुषोत्तम डांगी (चिटणीस, कसबा विधानसभा), भरत परिहार (चिटणीस, पर्वती विधानसभा), चंद्रोदय कुमार (चिटणीस, कसबा विधानसभा), अमित मुनोत (चिटणीस, लक्ष्मी रोड विधानसभा), धवलभाई परमानी (चिटणीस, कोथरुड विधानसभा), योगेश त्रिवेदी (चिटणीस, कसबा विधानसभा), विनोद चौधरी (चिटणीस, खडकवासला विधानसभा), अमित सोलंकी (चिटणीस), अभिजीत राऊत (चिटणीस), छोटूराम शायनी (चिटणीस), पंकज उणेचा (प्रसिद्ध प्रमुख, शिवाजीनगर विधानसभा), ओमप्रकाश चौधरी (प्रसिद्ध प्रमुख, पर्वती विधानसभा), उमेश चौधरी (वरिष्ठ सल्लागार), अजित सांगळे (वरिष्ठ सल्लागार), शाम कलंत्रि ( वरिष्ठ सल्लागार), गोपीकृष्ण डाबी (सदस्य), किरण शर्मा (सदस्य), प्रकाश संचेती (सदस्य), सुनिल शहा (सदस्य), सनी हुड्डा (सदस्य), प्रसाद कुलकर्णी (कार्यक्रम व्यवस्थापन प्रमुख, खडकवासला विधानसभा)