Pune News | शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट टाकणं पडलं महागात ! पुण्यात भाजप पदाधिकार्‍याला NCP च्या कार्यकर्त्यांकडून ‘चपराक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यात भाजपच्या (BJP) एका पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (NCP Activists) मारहाण केल्याचा प्रकार समोर (Pune News) आला आहे. भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर (BJP Spokesperson Vinayak Ambekar) यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन चपराक दिली आहे. आंबेकर यांनी 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या विरोधात एक पोस्ट केली होती. यावरून जाब विचारण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना चपराक (मारहाण) दिली आहे.

 

भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी केलेल्या पोस्टविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या पोस्टनंतर विनायक आंबेकर यांनी माफी मागितली आहे. (Pune News)

 

”माझ्या कवितेत शेवटच्या 2 ओळी चुकीच्या लिहिल्या गेल्या होत्या. त्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता तरी देखील त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं माझे नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांनी कळवल्यामुळे ती पोस्ट मागे घेत आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची माफी मागत आहे.” असं म्हणत विनायक आंबेकर यांनी माफी मागितली.

 

Web Title :- Pune News | bjp worker beaten by ncp workers in pune ncp chief sharad pawar facebook post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा