Pune News : लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्टतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणेतर्फे शनिवार दि.९ व रविवार दि. १० जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिर(Blood Donation) आणि कोरोना अँटिबॉडी चेकअपचे आयोजन केले आहे. हे शिबीर किट्रॉनिक्स इंडिया, करिष्मा सोसायटीजवळ, कोथरूड येथे होणार आहे. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट, आचार्य आनंदऋषीजी रक्तपेढी यांचे या रक्तदान शिबिरासाठी(Blood Donation) सहकार्य लाभले आहे.

या शिबीरात सर्वासाठी सवलतीच्या दरात कोरोना अँटिबॉडी टेस्टींगची सुविधाही जनकल्याण रक्तपेढीतर्फे ऊपलब्ध करण्यात आली आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त ऐश्वर्या चपळगांवकर आणि सचिव नितीन पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.