Pune News | क्रांनीच सोलर व रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या रक्तदान शिबीरात 41 जणांचे रक्तदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | क्रांनीच सोलर (krannich solar pvt. ltd) व रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या (Rotary Club of Pune University) संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.20) रक्तदान शिबीराचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले होते. भारती हॉस्पिटल ब्लड बँकेच्या (Bharati Hospital Blood Bank) सहकार्याने क्रांनीच सोलर कंपनीच्या आवारात रक्तदान शिबिर (Pune News) घेण्यात आले. या रक्तदान शिबीरात 41 जणांनी रक्तदान केले.

क्रांनीच सोलर कंपनीच्या आवारात, या वर्षी दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर (Blood Donation Camp) आयोजित करण्यात आले होते.
शिबिरामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान केले.
कंपनीकडून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 41 रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या.
यावेळी क्रांनीच सोलर कंपनीचे प्रमुख राजेश तोमर (Rajesh Tomar), संदीप बनोडिया (Sandeep Banodia), रोटरी क्लब पुणे युनिव्हर्सिटीचे पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) व राकेश ठाकूर (Rakesh Thakur), भारती हॉस्पिटल ब्लड बँकचे आशिफ शेख तसेच भारती ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
शिबिराचे नियोजन रक्षणदा लांडे, पृथ्वीराज पाटील व आशिफ शेख यांनी (Pune News) केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एका जर्मन कंपनीच्या (German company) कर्मचाऱ्यांचे असे दोनदा समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून, तसेच रोटरी क्लबच्या माध्यमातून आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. याचे अनुकरण अजून मोठ्या कंपन्यांनी करावे, असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले.

हे देखील वाचा

Narayan Rane on Uddhav Thackeray | नारायण राणेंचा CM ठाकरेंवर घणाघात; म्हणाले – ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म, आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Corona vaccination in India | भारताचा ऐतिहासिक विक्रम ! कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Blood donation of 41 people at Kranich Solar and Rotary Club of Pune University’s blood donation camp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update