Pune News : बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   रोट्रेक्ट क्लब ऑफ पुणे – ऊर्जा व युथ द पॉवर टू चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने बॉक्स क्रिकेट (चैरिटी क्रिकेट लीग 2.0 )स्पर्धा आयोजीत केली होती.त्यात पुणे शहर मधील विविध 25 स्वयंसेवी संस्थांनी भाग घेतला.ह्या स्पर्धेला पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे,मदत प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सचिनअप्पा मुजुंमले यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर व उपमहापौर यांनी क्रिकेट मैच खेळून स्पर्धा चे उद्घाटन केले.

ह्या निमित्त युथ द पॉवर टू चेंज चे अध्यक्ष रोहन शेट्टी,रोटरी क्लब ऑफ पुणे – ऊर्जा अध्यक्षा पूजा जहागीरदार आणि सुजय शेट्टी उपस्थित होते. ह्या स्पर्धेतून येणाऱ्या निधीतून दिघी येथील ” मातृछाया अनाथाश्रम ” ला दोन्ही संस्था मदत करणार आहेत.