Pune News : मानलं बुवा… बिअर शॉपी फोडली, पण बिअर चोरली नाही…

पुणे (Pune) : पोलिसनामा ऑनलाइन – काही गोष्टी आजही फक्त विश्वासावर चालतात; त्यातलाच एक म्हणजे गुन्हेगारी अन दोननंबर आता पहाना एकीकडे शहरासह जिल्ह्यात घरे अन दुकाने फोडणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. पण एका ठिकाणी चोरट्यांनी अक्की बिअर शॉपी फोडली पण त्यातून बिअर काही चोरल्या नाहीत. फक्त 800 ते 1000 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली. खडकवासला भागात घडलेल्या या घटनेची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली असून, चोरट्यांना देखील मानलं बुवा अस म्हणून लागले आहेत.

याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एकाच रात्रीत साई कार डेकोर, रुबाबदार क्लॉथ सेंटर आणि स्वागत बिअर शॉपी अशी तीन दुकाने फोडली. यातील साई कार डेकोर या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे तेथील चोरी या कॅमेऱ्यात कैद झाली. तोंड बांधलेल्या अवस्थेतील तीन चोरटे चोरी करताना दिसत आहेत. त्यानंतर यात चोरट्यांनी आपला मोर्चा स्वागत बिअर शॉपी कडे वळवला. चोरट्यांनी स्वागत बिअर शॉपी च्या शटर उचकटून आत प्रवेश केला आणि गल्ल्यात असणारे आठशे ते हजार रुपये चोरून नेले. मात्र या चोरट्यांनी एकाही बियरला हात लावला नाही. दरम्यान हे चोरटे रुबाबदार क्लॉथ सेंटरचे ग्रुप सोडून शटर उचलण्याचा प्रयत्नात असताना त्याचा आवाज झाला आणि वर राहणारे दुकानमालक जागे झाले आणि त्यांनी धाव घेतली. त्यांना पाहून चोरट्यांनी पळ काढला. अधिक तपास हवेली पोलीस करत आहेत.