Pune News : जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  रात्रीच्या वेळी घरात घुसून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका सराईतास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला सहा मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुशिल आच्युतराव सुर्यवंशी (वय २५) असे त्याचे नाव आहे.

याबाबत २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पाच जणांना यापुर्वीच अटक करण्यात आली असून आणखी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० डिसेंबर २०२० रोजी पहाटे चारच्या सुमारास ताडीवाला रस्ता परिसरात हा प्रकार घडला होता. घटनेच्या दिवशी फिर्यादी या त्यांच्या पतीसह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात झोपल्या होत्या. तर, त्यांचे दिर दुसऱ्या मजल्यावर राहण्यास होते. यावेळी, माझ्या घराचा दरवाजा तोडुन काही लोक घरात येत असल्याने फिर्यादी यांच्या दिराने सांगितले. त्यानंतर फिर्यादी या त्यांच्या पतीसह दुसऱ्या मजल्यावर आल्या त्यानंतर त्या कुटुंबियांसह गॅलरीत आले असता आरोपींनी खाली या, तुमच्या दोघांचा विषय संपवून टाकतो, असे म्हणत पळून गेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.