Pune News : व्यावसायिकाच्या पत्नीची आत्महत्या, कोथरूडमधील रामबाग कॉलनीतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रद्दी व्यावसायिकाच्या पत्नीने सतत होणाऱ्या त्रासाला अन छळाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविका विलास झोरे (वय 34, रा. कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत भाविका यांच्या आई शांती पिंगळे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विलास झोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास व भाविका यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झालेला आहे. त्यांना तीन मूल आहेत. ते रामबाग कॉलनी येथे रहातात.

दरम्यान विलास यांचा रद्दीचा व्यवसाय आहे. विलास हे पत्नी भाविका यांना तुला काय काम आहे, तूला स्वयंपाक येत नाही, मुलांकडे लक्ष नाही असे टोचून बोलून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत असत. या त्रासाला कंटाळून भाविका यांनी फिनेल पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या करत आहेत.