Pune News | छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड, नाशिक येथे २० मे २९ मे या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५७ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी १५ मेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.(Pune News)

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.

उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी (युनिर्व्हरसीटी इंट्री स्कीम) एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे १५ मेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे.
मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांचे संकेतस्थळ https://mahasainik.maharashtra.gov.in वर सर्च करुन त्यामधील एसएसबी ५७ कोर्ससाठी
(किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व परिशिष्ठांची प्रत पूर्ण भरून तीन प्रतीत सोबत घेऊन यावी.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी [email protected], दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

Pune Fraud Case | पुणे: आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, आरोपीला जामीन मंजूर

Hadapsar Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार दिल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ACB Trap Case | पाच हजार रुपये लाच घेताना पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Aaditya Thackeray In Maval Lok Sabha | आदित्य ठाकरे आज मावळमध्ये, संजोग वाघेरे भरणार उमेदवारी अर्ज, म्हणाले ”महागाईने त्रस्त जनता…”