Pune News | गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सभागृह नेते पद रद्द करा; नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी

भारतीय संविधानाचा अवमान केलेल्या गणेश बिडकर यांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News |जेव्हा एखादा प्रतिनिधी नागरिकांच्या मतदानाने निवडून येत नाही तरी सुद्धा संविधानाच्या जोरावर आणि ताकतीवर एखाद्या पदावर बसत असेल तर त्यांनी हे भान ठेवायला पाहिजे कि, ज्या संविधानामुळे येथे पोहचलो आहोत त्या संविधानावर अवमान जनक आपण कसे बोलू शकतो? यांचा अधिकार कोणीही तुम्हाला दिला नाही. जो व्यक्ती संविधानाचा अपमान करतो त्याला संविधानाने दिलेल्या कोणत्याही पदावर बसण्याचा अधिकार नाही. आज या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून गणेश बिडकर (ganesh bidkar) यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना दिलेल महानगरपालिकेतील (Pune Corporation) सभागृह नेते पद रद्द करण्यात यावे ही मागणी शिवसेनेच्या वतीने नगरसेविका पल्लवी चंद्रशेखर जावळे (Shiv Sena corporator Pallavi Chandrasekhar Jawale) यांनी व्यक्त केली.

 

 

 

भारतीय संविधानाचा अवमान केल्याबद्दल बीजेपीचे पदाधिकारी व पुणे मनपाचे सभागृहनेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar, Leader of Pune Municipal Corporation) यांच्या विरोधात शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या (pune cantonment vidhan sabha constituency) वतीने तिव्र निदर्शने देऊन व घोषणाबाजी करत निषेध वर्तवण्यात आला यावेळी जावळे बोलत होत्या.
संत कबीर चौक, नाना पेठ, पुणे येथे झालेल्या या निषेध आंदोलनाप्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे,
विधानसभा प्रमुख अभय वाघमारे, उपशहर संघटिका नगरसेविका पल्लवी चंद्रशेखर जावळे,
उपविधानसभा प्रमुख उत्तम भुजबळ, उपशहर संघटक चंद्रशेखर जावळे, पद्मा सोरटे, नागेश शिंदे,
रोहिणी कोल्हाड, सुदर्शना त्रिगुणाईत, देविका घोसरे, सबिया सेख तसेच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा
मतदारसंघांमधील सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना अधिकारी, महिला पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

गणेश बिडकर – एका दैनिकाच्या फेसबुक लाईव्हवरील माझे ,’घटना समुद्रात बुडवा‘ हे वक्तव्य संदर्भासहित ऐकावे. यावर माझी भूमिका मांडण्यापूर्वी मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील प्रत्येकाला न्याय मिळावा अशा हेतूने घटनेची निर्मिती केली आहे. विकास आराखड्यासाठी महापालिकेला मिळालेले अधिकारही बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेने महापालिकेला दिलेले आहेत, त्या घटनादत्त अधिकाराचा गळा घोटण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, याचा अर्थ त्यांचीच कृती ही घटनेचा अवमान करणारी आणि घटनेला किंमत नाही हा संदेश देणारी आहे.

त्यांच्या या कृतीविषयी असलेला त्रागा माझ्या शब्दातून व्यक्त झाला आहे. बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या घटनेमुळेच माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राजकारणात संधी मिळालेली आहे , अशी माझी प्रामाणिक भावना आहे. घटनेचा अवमान करण्याचा हेतू माझ्या स्वप्नात देखील येउ शकत नाही. माझ्या मूळ मुद्द्याला उत्तर देतां येत नसल्याने माझ्या वक्तव्याचे भांडवल केले जाते आहे.
विकास आराखड्यासंदर्भात पुणे महापालिकेच्या घटनादत्त अधिकारांबद्धल मी बोलतच राहील.
माझ्या एखाद्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून घटना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न मी कधीही यशस्वी होउ देणार नाही.

तथापी, माझ्या तोंडातून निघालेल्या वक्तव्याबद्धल दिलगिरी व्यक्त करण्यास मला कोणताही संकोच वाटत नाही.
बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्य घटना माझ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत पवित्र, वंदनीय आणि अनुकरणीयच आहे.

 

Web Tital : Pune News | Cancel the post of Leader of the House by filing a case against Ganesh Bidkar; Demand of corporator Pallavi Jawale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Aadhaar Card चे enrollment status ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

Maharashtra Police | हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडीओ बनवणं पोलीस कर्मचाऱ्याला पडलं महागात; तडकाफडकी निलंबन (व्हिडीओ)

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर