Pune News : 1 कोटी 20 लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नी, 3 मुलांसह 5 जणांविरूध्द 5 जणांविरूध्द सोसायटीची न्यायालयात धाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या पत्नीसह तीन मुलांवर पत संस्थेची 1 कोटी 20 लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार होता पण न्यायालयाने आता त्यावर 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत स्टे दिला आहे. त्यांनी वाजरेत अस्तित्वात नसलेल्या जमीनेचे बनावट कागदपत्रे सादर करून हे कर्ज घेतले असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे 9 फेबु्रवारी / त्यापुर्वी देखील होते. न्यायालयाचा आदेश झाल्यानंतर सचिन दत्तात्रय टेमगिरे यांच्या वकिलांनी न्यायालयात पिटीशन दाखल केली. त्यावर न्यायालयाने पोलिसांना सध्या म्हणणे सादर करू नका. दोन्ही पार्टी प्रकरण 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत सामंजस्याने सोडविण्यास तयार झालेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाने कोथरूड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक यांना 22 फेबु्रवारी 2021 पर्यंत एफआयआर दाखल करू नका असा आदेश दिला आहे.

याप्रकरणी सचिन दत्तात्रय टेमगिरे (वय 40), अमोल दत्तात्रय टेमगिरे (वय 39) मनोज दत्तात्रय टेमगिरे (वय 37), पत्नी मंगला दत्तात्रय टेमगिरे (62, (सर्व रा. फ्लॅट नं. 1301, 1302, विंग एफ, इंद्रधनु सोसायटी, वनाज कंपनी जवळ, कोथरूड)) आणि भगवान विठोबा बराटे (रा. कृष्णकुंज, कर्वेनगर), आणि गणेश भागुजी कराळे (54, रा. 15, स्नेहांकीत कॉलनी, कर्वेनगर) यांच्याविरूध्द सोसायटीच्या वतीने तक्रार देण्यात आली होती.

सारस अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी संस्थेकडून गैर तक्रारदारांनी 1 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी तारण म्हणून त्यांनी वारजे येथील गट नं. 73 ही जागा ठेवली होती. कर्ज मिळाल्यानंतर त्यांनी काही महिने नियमानुसार संस्थेचे हप्ते भरले. पण यानंतर त्यांनी हप्ते भरण्यास टाळाटाळ केली. याबाबत तक्रारदार यांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी हप्ते आर्थिक अडचणीमुळे भरू शकत नसल्याचे सांगितले. यामुळे तक्रारदार यांनी जप्तीची कारवाई सुरू केली. 2014 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

परंतु, त्यावेळी तारण ठेवलेली जागाच अस्तित्वात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी याबाबत सखोल चौकशी केली असता आरोपींनी जागा अस्तित्वात नसताना त्याचे बनावट कागदपत्रे सादर केले. हे काम गैर तक्रारदारांनी संगनमताने व माहित असताना खोटे व बनावट केल्याचे लक्षात आले. यानंतर फिर्यादीने न्यायालयात याबाबत दाद मागितली. न्यायालयाने याची सुनावणी घेत पोलिसांना 156/3 नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे 9 फेबु्रवारी / त्यापुर्वी देखील होते. न्यायालयाचा आदेश झाल्यानंतर सचिन दत्तात्रय टेमगिरे यांच्या वकिलांनी न्यायालयात पिटीशन दाखल केली. त्यावर न्यायालयाने पोलिसांना सध्या म्हणणे सादर करू नका. दोन्ही पार्टी प्रकरण 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत सामंजस्याने सोडविण्यास तयार झालेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाने कोथरूड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक यांना 22 फेबु्रवारी 2021 पर्यंत एफआयआर दाखल करू नका असा आदेश दिला आहे.