Pune News : पिस्तुल घेऊन फिरणार्‍या दोघांना चंदननगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बेकायदेशीर पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना चंदनननगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल व ५ जिंवत काडतुसे, कार असा १० लाख ४१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

बजरंग विठ्ठल शिरगे (वय २०, रा. वडगाव शेरी ) व रणजित रामचंद्र लोंढे (वय ३८, रा. खराडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून जोरदार कारवाई केली जात आहे. त्यात हद्दीत गस्त घातली जात असून, सराईत गुन्हेगारांची माहिती काढली जात आहे.

यादरम्यान चंदननगर पोलीसांचे तपास पथक माहिती घेत असताना पोलीस हवालदार श्रीकांत गांगुर्डे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, एकजण संशयित असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी नेहमीप्रमाणे पोलिसांनी या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर त्याला सापळा रचून पकडण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अब्दुल करीम सय्यद, युसूफ पठाण, श्रीकांत गांगुर्डे, महेश नाणेकर, अमित कांबळे, नामदेव गडदरे यांच्या पथकाने केली. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन आरमळ करीत आहेत.