Pune News : 3G सिमकार्ड 4G करण्याच्या नाद पडला दीड लाखास, ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 3 जी सिमकार्ड 4 जी करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांने ( Cyber thief) जेष्ठ नागरिकास दीड लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 74 वर्षीय जेष्ठांने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे साळुंखे विहार परिसरात आले आहे. दरम्यान त्यांना दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तसेच त्यांना तुमचे सिमकार्ड हे 3 जी असून, ते 4 जी करून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना टिम व्ह्यू हे अप डाउनलोड करण्यास सांगितले. तर त्यावरून 10 रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानी पैसे ट्रान्सफर केल्यानंतर सायबर चोरट्यांने त्यांच्या खात्यावरून दीड लाख रुपये ऑनलाइन काढत त्यांची फसवणूक केली. त्यांनी खाते चेक केले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.