Pune News | लहान मुलांमध्ये फ्लूची साथ! बालरोगतज्ज्ञांनी केले काळजी घेण्याचे आवाहन

Pune News | Children with the flu! Pediatricians call for care

पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | सध्या पावसाळ्यामुळे साथरोगांचा प्रसार वाढत आहे. लहान मुलांमध्ये फ्लूची (Flu In Childrens) साथ सुरू झाली आहे. अशातच जर मूल आजारी पडले तर त्याला शाळेत पाठवू नये. कारण त्याचा इतर मुलांना संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती बालरोगज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा (Dr Dilip Sarda) यांनी दिली.

ते म्हणाले की, पावसाळा सुरू झाल्यापासून साथरोगांचा प्रसार वाढला आहे. सध्या लहान मुलांमध्ये फ्लूची साथ सुरू झाली आहे. अचानक ताप, सर्दी, उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे दिसून येत आहेत. पावसाळ्यात लहान मुलांना फ्लूचा संसर्ग होतो. याचबरोबर लहान मुलांना डेंग्यूचा धोकाही वाढला आहे. लहान मुलांमध्ये ताप आणि अंगावर पुरळ अशी लक्षणे दिसून आल्यास पालकांनी तातडीने त्यांना नजीकच्या डॉक्टरांकडे न्यावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करावेत. सध्या साथरोगांचा प्रसार वेगाने सुरू असल्याने मूल आजारी पडल्यास त्याला शाळेत पाठवू नये. कारण त्याचा इतर मुलांना संसर्ग होऊ शकतो. अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा यांनी दिली.

काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम?

सूर्या हॉस्पिटलमधील (Surya Hospital) बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत खंदारे यांनी (Dr Jayant Khandare) सांगितले की, प्रौढ व्यक्तींमध्ये डेंग्यूची लक्षणे सौम्य असतात. अनेकदा प्रौढ व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. इतर कोणत्याही वयोगटातील व्यक्तींपेक्षा नवजात बालकांसाठी डेंग्यू सर्वात जास्त धोकादायक ठरतो. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांमध्ये डेंग्यूमुळे डेंग्यू शॉक सिंड्रोम होऊन प्रकृतीची गंभीर गुंतागुंत होण्याची खूप जास्त शक्यता असते. यामध्ये खूप जास्त रक्तस्त्राव आणि अवयवांचे नुकसान होऊ शकते. त्याला तातडीने वैद्यकीय उपचार व देखभालीची गरज असते. लहान मुलांना पावसाळ्यात फ्लूचा संसर्ग होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी १ ते १० वर्षे वयोगटातील मुलांना दरवर्षी इन्फ्लूएन्झाची लस देणे गरजेचे आहे. यातून लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊन त्यांना फ्लूचा संसर्ग होणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद

PMC Solid Waste Management Dept | पोलीसनामा इम्पॅक्ट ! स्वच्छ सेवकांना तातडीने रेनकोट उपलब्ध करून दिले जातील – पुणे महापालिका

Kothrud Hit & Run Case | कोथरूडमध्ये हिट अँड रन; खाजगी बसने दुचाकीस्वारासह इतर वाहनांना उडवले (Video)

Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरले ! मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात; नागरिकांना खबरदारीचे आवाहन (Video)

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)