Pune News | कर्करोग निदानासाठी शहरात पहिलीच ‘मेडिकल मोबाइल व्हॅन’; महिला दिनानिमित्त ‘एमएनजीएल’ची सेवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कंपनीच्या वतीने शहराच्या वस्ती विभागातील महिलांमधील कर्करोग निदानासाठी समर्थ युवा फाउंडेशनला महिला दिनानिमित्त मेडिकल मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली. (Pune News)

 

या वेळी एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, संचालक (वाणिज्य) संजय शर्मा, स्वतंत्र संचालिका बागेश्री मंथाळकर, राजेश पांडे, सरोज पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Pune News)

 

राजेश पांडे म्हणाले, देशात दरवर्षी कर्करोग होणाऱ्या सरासरी ७ लाख महिला रुग्णांची भर पडते. स्तन, गर्भाशय, कोलोरेक्टल, अंडाशय आणि तोंडाचा कॅन्सर महिलांमध्ये आढळतो. देशात दर आठ मिनिटाला एका महिलेचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. कर्करोगाच्या तिसर्‍या किंवा चौथ्या टप्प्यावर उशिरा निदान झाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. वेळेवर निदान झाल्यास रुग्ण वाचू शकतो.

 

कुमार शंकर म्हणाले, समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत उपयुक्त ठरेल अशी सेवा देण्याची संधी मिळाली याचे आम्हाला समाधान वाटते.
एमएनजीएलने व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदारीतून (सीएसआर) मेडिकल मोबाइल व्हॅन उपलब्ध करून दिली आहे.
अशाप्रकारची शहरातील ही पहिलीच सेवा आहे. कर्करोगाचे निदान आणि रक्ताच्या विविध तपासण्यांसाठी
आवश्यक असणारे आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत.
विशेषतः वस्ती विभागामध्ये ज्या संस्थांना महिलांसाठी कर्करोग निदानाच्या शिबिरांचे आयोजित करायचे आहे,
त्यांच्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

 

Web Title :- Pune News | City’s first ‘medical mobile van’ for cancer diagnosis; Service of ‘MNGL’ on the occasion of Women’s Day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dr. Vijaykumar Gavit | संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार; आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Economic Survey of Maharashtra | ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ अहवाल विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या