Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कोम्बींग ऑपरेशन, 138 जणांची तपासणी तर कारवाईत 33 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात गुन्हे शाखेने कोंबींग ऑपरेशन राबवित 138 गुन्हेगारांची तपासणी केली आहे. त्यापैकी 80 गुन्हेगार मिळाले आहेत. प्रतिबंधक कारवाईत 33 आरोपींना अटक केली आहे. त्यात 1 लाख 83 हजार 485 रूपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या अचानक कॉम्बिन ऑपरेशनमुळे मात्र गुन्हेगाराची तारांबळ उडत आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार शहरात गुन्हे शाखा अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवत आहे. बुधवारी रात्री देखील पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली.

पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले जप्त केली आहेत. तर चौदा कोयते व दोन तलवारी जप्त करत 16 जणांना अटक केली आहे. तडीपारीचा आदेश भंग करून शहरात वावरणार्‍या पाच तडीपारांना पोलिसांनी अटक केली आहे. ते तडीपार असताना शहरात वास्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे.

तसेच अमंली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी 2 किलो 766 ग्रॅम गांजा जप्त केला. यावेळी एकाला अटक करण्यात आली आहे. तर तंभाखु जन्य पदार्थ विक्री करणार्‍या दोघांना ताब्यात घेत 26 हजार 665 चा माल जप्त केला आहे. तर अवैधरित्या दारू विक्री करताना सापडल्याने दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई भारती विद्यापीठ आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. चतुश्रृंगी, कोथरुड, वानवडी, हडपसर पोलिस ठाण्याच्या गंभीर गुन्हयातील पाहिजे असलेल्या एकुण पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांना संबंधीत पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.