Pune News | एरंडवणे-कर्वेनगर भागातील प्रलंबीत कामे लवकर पूर्ण करा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची मागणी

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | एरंडवणे, कर्वेनगर भागात खोदकाम करण्यात आल्याने या भागात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याभागातील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करुन नागरिकांना (Pune News) दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर (BJP Spokesperson Sandeep Khardekar) यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.

कर्वेनगरकडे जाणाऱ्या अलंकार पोलीस चौकीजवळील (Alankar Police Chowki) शैलेश पुलाचा (Shailesh Bridge) अर्धा भाग गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून या वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून (Pune News) केली जात आहे.

30 एप्रिल नंतर शहरातील खोदाई बंद करण्यात आली आहे. मात्र एरंडवण्यात शैलेश पूल येथील काम अद्याप प्रलंबित असून तेथे रोजच वाहतूक कोंडी होत असून याचा नागरिकांना त्रास होत आहे. तसेच समर्थ पथच्या कोपऱ्यावर (अलंकार पोलीस स्टेशन जवळ) आणि पुढे शक्ती 98 चौकात (देवेश चितळे चौक) येथे ही खणून ठेवले असून सध्या हे काम अत्यंत संथ गतिने सुरु आहे.

 

अशीच परिस्थिती पुढे विठ्ठल मंदिर रस्त्यावर आहे. तेथे ही अवजड विद्युत वाहिन्या असून ते काम ही थंडावल्याचे चित्र आहे.
संबंधित कामं कोणत्या खात्याची हे लक्षात येईल असे फलक लावण्यात आलेले नाहीत.
याशिवाय याठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही.
तरी ही कामे त्वरित पूर्ण करावीत व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी संदीप खर्डेकर यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.

 

 

Web Title :- Pune News | Complete the pending works on Shailesh Bridge in
Erandwane at the earliest, demands BJP spokesperson Sandeep Khardekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | कोर्टाच्या निकालावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले – ‘मी दिल्लीला…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन –
सोसायटीच्या वॉचमन्सला हत्याराचा धाक दाखवून चंदनाच्या झाडांची चोरी करणार्‍या टोळीला अटक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – डेक्कन येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमधील
विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Congress Mohan Joshi On Shinde Fadnavis Govt | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा – मोहन जोशी