Pune News : वाकडेवाडी येथील जोग सेंटरमधील कार्यालयात 5 जणांकडून गोंधळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसीच्या जागेवर समाज मंदीर उभारण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या पाचजणांनी कार्यालयात गोंधळ घालून कर्मचाऱ्यालाच अपशब्द वापरले. हा प्रकार वाकडेवाडी येथील जोग सेंटरमध्ये घडली.

महादेव मोतीराम साबळे (वय ३६ रा. अजंठानगर, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील सरोदे वय ५४, रा. भेकराईनगर, हडपसर यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुनील वाकडेवाडीतील एमआयडीसी कार्यालयात नोकरीला आहेत. काल दुपारी महादेव इतर चार महिलांसह कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेले होते. मात्र, अधिकाNयांची मिटींग सुरू असल्यामुळे सुनील यांनी आरोपींना अडविले. त्यावेळी महादेवसह इतर महिलांनी आरडा-ओरड करून सुनील यांना ढकलून दिले. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप चव्हाण करीत आहेत.