Pune News | अभिनंदनिय ! CS च्या परीक्षेत पुण्याची वैष्णवी बियाणी देशात प्रथम !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने institute of company secretaries of india (ICSI) कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह Company Secretary Executive (CS) परीक्षेचा जून २०२१ सत्राच्या निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पुण्याच्या (Pune News) कात्रजमधील (Katraj) सुखसागरनगर (sukhsagar nagar) येथील वैष्णवी बद्रीनाथ बियाणी (Vaishnavi Badrinath Biyani) हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. वैष्णवी सीएसमधील शेवटचा टप्पा म्हणजे प्रोफेशनल परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. नवीन अभ्यासक्रमांमध्ये वैष्णवीने हे यश मिळवले असून एकूण ९०० गुणांपैकी ६०६ गुण तिने मिळवले आहेत.

वैष्णवीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असून तरीही आपले शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी विकास योजना या संस्थेकडून बारावीनंतर तिला शिष्यवर्ती मिळाली.
त्या माध्यमातून तिने सीएसचे शिक्षण पूर्ण केले. राजीव गांधी नगरमध्ये वैष्णवीच्या वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे.
त्यावरच तिच्या संपूर्ण कुटूंबाचे उदरनिर्वाह चालतो. वैष्णवीचे दहावीपर्यंतचे शिक्षण (Pune News) सुखसागरनगरमधील हिरामण बनकर शाळेत
(hiraman bankar school sukhsagar nagar) झाले. दहावीला ती ९३.६० टक्के घेऊन उत्तीर्ण झाली.
११ वी आणि १२ वीचे शिक्षण नुतन मराठी विद्यालयातून nutan marathi vidyalaya (NMV) पूर्ण करत बारावीला कॉमर्स शाखेतून ८९.२३ गुणांसह ती उत्तीर्ण झाली होती.
मात्र, वैष्णवीचा हा प्रवास खडतर होता. एका पब्लिक कंपनीमध्ये ट्रेनींग सुरु ठेऊन सीएसचा अभ्यास पूर्ण करत तिने देशातून प्रथक क्रमांक मिळवला आहे.
वैष्णवी सीएसच्या फाऊंडेशन म्हणजे पहिल्या पायरीच्या परिक्षेतही देशातून १७वा क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाली होती.
तर दुसऱ्या म्हणजे एक्झिक्युटिव पायरीमध्ये आठवा तर तिसऱ्या म्हणजे प्रोफेशनल पायरीला देशातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

 

मुलीच्या यशाबद्दल बोलताना वैष्णवीचे आई-वडील संगीत आणि बद्रीनाथ बियाणी म्हणाले, आज आम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मिळाल्याचा आनंद होत आहे.
हा दिवस कधीही विसरता येण्यासारखा आहे. आम्ही खूप आनंदी आहोत.

 

Web Title : Pune News | Congratulations! Pune’s Vaishnavi Biyani first in the country in CS exam!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nora Fatehi | 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED कार्यालयात पोहचली नोरा फतेही, जॅकलीनची सुद्धा पुन्हा होणार चौकशी (व्हिडीओ)

Rupali Chakankar | भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वत:हूनच मान्य केलं – रूपाली चाकणकर

Mask Causing Headache | मास्क घातल्याने डोकेदुखी होतेय का? मग जाणून घ्या यामागील कारण! ‘या’ पध्दतीनं करा उपचार