Pune News : कोंढव्यात विक्रमी 60 फुटी फ्लेक्स लावून शरद पवार यांना शुभेच्छा !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कोंढव्यात विक्रमी 60 फुट उंचीचा फ्लेक्स लावून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अ‍ॅॅड हाजी गफूर पठाण यांच्या वतीने ज्योती चौकात उभारण्यात आलेला हा भव्य फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. क्रेनच्या सहाय्याने हा फ्लेक्स उभारण्यात आला. सध्या पुण्यासह राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हे लक्षात घेऊन शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी तेजस हॉलमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ८० जणांनी रक्तदान केले.

याबाबत नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी पोलिसनामाला सांगितले की, देशातील जनतेच्या कल्याणासाठी वयाच्या ८० व्या वर्षीही शरद पवार दिवस रात्र काम करीत आहेत. देशाचे सार्वभौमित्व टिकावे म्हणून काम करणार्‍या या भूमीपुत्राच्या सन्मानासाठी शनिवारी दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ज्योती चौकात उभारण्यात आलेल्या भव्य फ्लेक्सखाली केक कापण्यात आला. त्याचे वाटप लहानथोरांना करण्यात आले.