Pune News | कन्हैयाकुमारकडे काँग्रेस मोठी जबाबदारी सोपवणार, काँग्रेस प्रवेशाचे पुणे कनेक्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | ‘बिहार से तिहार तक’ (bihar se tihar tak) या पुस्तकामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार (kanhaiya kumar) आणि गुजरातमधील युवा नेते जिग्नेश मेवानी (jignesh mevani) हे येत्या २ ऑक्टोबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कन्हैयाकुमार यांच्यावर बिहारमध्ये मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (Jawaharlal Nehru University) आंदोलन आणि विद्यार्थी चळवळीमुळे कन्हैयाकुमार यांचे नेतृत्व उदयास (JNU) आले. त्यांनी काही काळ भाकपमध्ये काम केले. मात्र त्यांनी आता काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्हैयाकुमार आणि मेवानी यांनी काँग्रेसमध्ये यावे म्हणून तहसीन पूनावाला (tehseen poonawalla) यांनी गेल्या काही महिन्यांपासून वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या भेटी घालून दिल्या होत्या. अखेरीस दोघांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय झाला.

आपल्या पुस्तकाच्या निमित्ताने कन्हैयाकुमार भारतात अनेक ठिकाणी फिरले.
विविध न्यूज चॅनलवर काँग्रेसची बाजू मांडणारे तहसीन पूनावाला यांनी कन्हैयाकुमार यांना तीनेक वर्षांपूर्वी पुण्यातही निमंत्रित केले होते.
त्यांची जुनी मैत्री पुढे कन्हैयाकुमार यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग बनली आहे. पंजाबातील (punjab) राजकीय नाट्यावेळीही प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (navjot singh sidhu) दिल्लीत (Delhi) आले तेव्हा पूनावाला यांच्या घरीच थांबले होते, असे पूनावाला यांच्या घनिष्ठ मित्रांकडून समजते. माध्यमांना टाळण्यासाठी सिद्धू यांनी या मार्ग निवडला होता. (Pune News)

Web Titel :- Pune News | Congress will hand over big responsibility to Kanhaiyakumar, Pune connection of Congress entry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gulab Cyclone | किनारपट्टीवर ‘गुलाब चक्रीवादळा’चा रुद्रावतार, आगामी 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (व्हिडिओ)

Post Office | विना जोखीम 124 महिन्यात ‘डबल’ करा आपले पैसे, सुरक्षेची 100% खात्री, जाणून घ्या काय आहे योजना?

Dr Neelam Gorhe | पुणे शहरात भाजपचे अनेक प्राणी, त्यातीलच आमदार सुनील कांबळे एक – डॉ. नीलम गोर्‍हे (व्हिडीओ)