Pune News : उंड्रीतील 2 अनधिकृत इमारतींवर बांधकाम विभागाने केली मोठी कारवाई ! बहुतांश भाग यंत्रांच्या सहाय्याने पाडून टाकण्यात आला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महापालिकेच्या बांधकाम विभागाने नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांतील अनधिकृत बांधकामांवर लक्ष केले आहे. केशवनगर मुंढव्या पाठोपाठ आज उंड्री येथील अनधिकृत बांधकामांवर आज कारवाई करण्यात आली. याठिकाणी सुरू असलेल्या अनुक्रमे चार आणि पाच मजली इमारतींवर बहुतांश भाग पोक्लेनच्या सहाय्याने पाडून टाकण्यात आला.
मौजे उंड्री येथील स.नं. ४३ मधील वडाचीवाडी कडे जाणार्‍या रस्त्यांवर ही बांधकामे सुरू होती.

बांधकाम विभागाने त्यांना २७ नोव्हेंबरला नोटीसही बजावली होती. परंतू यानंतरही संबधित बांधकामांचे मालक महेश औताडे व इतर तसेच मनोहर हाडके, हुसेन शेख व इतरांनी खुलासा केला नव्हता. अखेर आज कार्यकारी अभियंता नामदेव गंभीरे, उपअभियंता दत्तात्रय चव्हाण, कनिष्ठ अभियंता अनुप गज्जलवार, प्रशांत कदम, राजाराम जाधव यांच्यासह उपनिरीक्षक ए.के. चाउस यांच्या नेतृत्वाखालील कडक पोलिस बंदोबस्तामध्ये जॉ कटर मशीन, पोक्लेन मशीन आणि दोन जेसीबींच्या मदतीने या दोन्ही इमारतींचा बराचसा भाग पाडून टाकला. या कारवाईमध्ये सुमारे १३ हजार ६७० चौ. फूट बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली.

Undri

पुणे महानगरपालिकेने शहर पोलिसांच्या सहकार्याने अनधिकृत बांधकामांविरोधात कडक धोरण अवलंबिले आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीने यंत्र सामुग्री तसेच मनुष्यबळ घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नये अथवा अनधिकृत बांधकामांमध्ये घर खरेदी करू नये, असा संदेशच या कारवाईमधून देण्यात येत आहे.

 

Undri

Undri