Pune News | मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, आता आईचा शॉक लागून मृत्यू; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पथदिव्याचा विजेचा शॉक (street light electric shock) लागून एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील (Pune News) कतारवाडी, भारतनगर येथे आज (शुक्रवारी) घडली आहे. पार्वतीबाई हिरामण झेंडे (वय-70) असे मृत्यू झालेल्या महिलेचा नाव आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी केली आहे. एवढी मोठी घटना घडली असताना देखील पुणे महापालिकेतील विद्युत विभागातील (Electrical department) एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने घटनास्थळाला भेट दिली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

पार्वतीबाई झेंडे यांना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पालिकेच्या पथदिव्यातून अचानक विजेचा शॉक बसला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन दिव्यांग मुली आहेत.
पार्वतीबाई या मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या.
त्यातच मागील वर्षी एका मुलीचा कोरोनामुळे (Corona) दुर्दैवी मृत्यू झाला.

वर्षभरापूर्वी मुलीचा आणि आज आईचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून झेंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi police station) संबंधित जबाबदार दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी स्थानिक नगरसेविका आणि नागरिकांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.

 

Web Title : Pune News | corona dies daughter now mother dies shock mountain grief family is in trouble

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Police | वस्तू गहाळ झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार देताना अ‍ॅफिडेव्हिटची गरज नाही, मागणी केल्यास होणार कारवाई

Pune Crime | पुण्यातील उद्योजकाच्या बंगल्यात सापडले एअर रायफल, 31 काडतुसे, नोटा मोजण्याच्या 2 मशीन; 70 लोकांकडून घेतलेले वीना सह्यांचे खरेदी खत जप्त

Digital Currency in India | भारतात कधी सुरू होऊ शकते डिजिटल करन्सीची ट्रायल? RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले…