Pune News | पुण्यातील आढावा बैठक अजित पवारांच्या अनुपस्थितीत; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे जिल्ह्यातील (Pune District,) कोरोना परिस्थितीची आढावा (Corona Review Meeting) घेण्यासाठी कौन्सिल हॉल येथे बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना नियमात शिथिलता देण्याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Corona Review Meeting in Pune in the absence of Ajit Pawar) उपस्थित राहणार नाहीत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. दरम्यान पालकमंत्री पवार उपस्थित राहणार नसल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. pune news | corona review meeting in pune in the absence of ajit pawar

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

गेल्या काही दिवसात पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरापाठोपाठ (Pune and Pimpri-Chinchwad) आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना (Corona) बाधितांचा दर 7 टक्क्यांच्या आत आला आहे.
यामुळे शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील निर्बंध हटवले जाण्याची शक्यता आहे.
निर्बंध शिथिलतेबाबतचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे हे शुक्रवारी (दि. 25) होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत जाहीर करतील, असे प्रशासनाने कालच स्पष्ट केले होते.
दरम्यान कालच वाझे प्रकरणात भाजपने (BJP) अजित पवार यांची CBI चौकशीची मागणी केली आहे.
तर दुसरीकडे पुण्यातील आंबील ओढा प्रकरणातील विकासक निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.
तर आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर इडीने छापेमारी केली आहे.
या सर्व घडामोडीमुळे अजित पवार बैठकीला गैरहजर असल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Web Title :-  pune news | corona review meeting in pune in the absence of ajit pawar

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा