Pune News | महात्मा फुले यांचा वसा पुढे नेण्याचे काम धीरज घाटेंकडून; माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडून शिष्यवृत्ती उपक्रमाचे कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘समाजातील प्रत्येक घर माझं आहे आणि त्या घरातील प्रत्येक व्यक्ती शिकली पाहिजे,‘ हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात (Pune) शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा फुले यांचा हाच वसा आणि विचार पुढे नेण्याचे काम नगरसेवक धीरज घाटे (Corporator Dheeraj Ghate) हे करीत आहेत, याचा मला आनंद आहे. केवळ पैशांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबणार नाही, यासाठी फक्त भाषणबाजी न करता प्रत्यक्ष कृती करणाऱ्या धीरज घाटे यांच्या कामाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा, अशा शब्दात माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार (ashish shelar) यांनी संजय घुगे शिष्यवृत्ती सहाय्य योजनेचे (Sanjay Ghuge Scholarship Assistance Scheme) पुण्यात (Pune) कौतुक केले.

माजी सभागृह नेते धीरज घाटे (Corporator Dheeraj Ghate) यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी (BJP) आणि साने गुरुजी तरुण मंडळाच्या (sane guruji tarun mandal) वतीने पुण्याच्या वेगवेगळ्या भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी मदत म्हणून सेवाभावी शिक्षक दिवंगत संजय घुगे यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती (Sanjay Ghuge Scholarship Assistance Scheme) वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेलार उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

संजय घुगे शिष्यवृत्ती सहाय्य योजनेच्या माध्यमातून एकूण तीनशे विद्यार्थ्यांना अकरा लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रातिनिधिक काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना मदतीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, आमदार मुक्ताताई टिळक (MLA Muktatai Tilak), भाजपाचे पुणे शहर सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक सरस्वतीताई शेंडगे, स्मिताताई वस्ते, रघुनाथ गौडा, अजय खेडेकर, माजी नगरसेविका मनिषा धनंजय घाटे, कसबा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष जितेंद्र पोळेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

‘धीरज घाटे यांना प्रत्येक गरीब आणि गरजू विद्यार्थ्याची काळजी आहे. त्याच काळजीतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना कमीअधिक प्रमाणात फटका बसला. पण विद्यार्थ्यांना त्याची सर्वाधिक झळ सोसावी लागते आहे. एकीकडे अनेकांचे रोजगार गेले, अनेकांच्या पगारात कपात झाली. शाळा ऑनलाईन झाल्या तर फीमध्ये कपात झाली नाही. उलट या वर्षी शाळांच्या फीमध्ये वाढच झाली आहे. राज्य सरकारने त्या संदर्भातही काहीच निर्णय घेतला नाही. या पार्श्वभूमीवर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून मदत येईल किंवा होणारही नाही.

पण लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी जबाबदारी उचलेन आणि फेरीवाले,
रिक्षावाले, दुकानातील कामगार, बलुतेदार,
पथारीवाला तसेच आर्थिक फटका बसलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्याचे शिक्षण सुरू ठेवण्याचे कर्तव्य निभावेन,
या वृत्तीतून धीरज घाटे आणि सहकाऱ्यांनी ही सेवा केली आहे.
ही मदत नाही, तर कर्तव्य आहे, सेवा आहे. हे दैवी काम आहे,
अशा शब्दांत शेलार यांनी घाटे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी बोलताना रा.स्व.संघाचे मा संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी या उपक्रमचे कौतुक करत विध्यार्थ्यानीही अशीच सहकर्याची भावना घेऊन पुढील काळात आपले शिक्षण पूर्ण करावे असे आवाहन करून करोनाच्या संकट काळात आपले कर्तव्यही विद्यार्थ्यांनी पाळले पाहिजे असे संदेश दिला.

साने गुरुजी तरुण मंडळ गेल्या वीस वर्षांपासून शैक्षणिक उपक्रम राबवित आहे.
गेली वीस वर्षे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आणि दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो.
यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आम्ही हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आणि गरीब विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलली,
असे धीरज घाटे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहरातील नगरसेवकांनी पूर्ण शहरात हा उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आमदार मुक्ता टिळक, रवींद्र वंजारवाडकर आणि घुगे सरांचा माजी विद्यार्थी तसेच मराठी कलावंत योगेश सुपेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
भाजपा कसबा विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र फाटे, आनंद पाटील, प्रशांत सुर्वे यांनी प्रयत्न केले.

Web Title :- Pune News | Corporator Dheeraj Ghate bjp leader ashish shelar Sanjay Ghuge Scholarship Assistance Scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला