पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | लोकसेवक पदाचा गैरवापर करून 5 कोटी 94 लाख 96 हजार 72 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar of Parner Jyoti Deore) यांच्याविरुद्ध राज्याच्या लोकायुक्तांकडे सोमवारी (दि. 30) तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता देवरे यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला आता आणखी खतपाणी मिळणार आहे.
राहुल झावरे (Rahul Jhaware), संदीप चौधरी (Sandeep Chaudhary), ज्ञानेश्वर लंके (Dnyaneshwar Lanke) व सुहास सालके (Suhas Salke) यांनी ॲड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode), ॲड. अजित देशपांडे (Adv. Ajit Deshpande) आणि ॲड. अक्षय देसाई (Adv. Akshay Desai) यांच्यामार्फत ही तक्रार दाखल केली आहे. राज्याच्या लोकायुक्त पदावर न्यायाधीश विद्याधर कानडे (Judge Vidyadhar Kanade) यांची नियुक्ती झाल्यानंतर दाखल झालेले हे पहिलेच प्रकरण आहे. याबाबत माहिती देण्यासाठी ॲड. सरोदे यांनी तक्रार यांच्यासह पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी ॲड. सरोदे यांनी सांगितले की, अप्पर तहसीलदार धुळे यांच्या विरोधात किशोर मोहनलाल बाफना (Kishore Mohanlal Bafna) यांनी दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित दस्तऐवज महत्त्वाचा आहे.
कारण त्यातून स्पष्टपणे दिसते की, देवरे जेव्हा धुळे येथे अप्पर तहसीलदार म्हणून काम करत होत्या तेव्हा त्यांनी नगरपालिकेच्या 48.65 एकर जागेबाबत एक हजार कोटींचा भ्रष्टाचार केला.
देवरे यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे याचिकेसोबत दाखल करताना तक्रारदारांनी संयुक्त चौकशी समितीत विभागीय आयुक्त नाशिक (Divisional Commissioner Nashik) यांच्याकडे दाखल झालेल्या अहवालाचा आधार घेतला आहे.
नगरपालिकेच्या 48.65 एकर जागेबाबत 1000 कोटींचा भ्रष्टाचार :
अप्पर तहसीलदार धुळे (Dhule) यांच्या विरोधात किशोर मोहनलाल बाफना यांनी दाखल केलेल्या
अपीलशी संबंधित दस्तऐवज अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्यातून स्पष्टपणे दिसते की ज्योती देवरे
जेव्हा धुळे येथे अप्पर तहसीलदार म्हणून काम करत होत्या तेव्हा त्यांनी नगरपालिकेच्या 48.65
एकर जागेबाबत 1000 कोटींचा भ्रष्टाचार केला, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.
सोसायटी सदस्यांना बेकायदेशीरपणे जमीन :
धुळ्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निष्कर्षाच्या पहिल्या मुद्द्यामध्ये नमूद केले आहे की
धुळे शहरात सर्वेक्षण क्र. 501 आणि 510, ‘उदयनमुख सामुदायिक शेत’ सोसायटीच्या सदस्यांना शेतजमिनीचे वाटप करण्यात आले.
त्यात असे आढळून आले की 48.65 एकर जमिनीची जमीन प्रत्यक्षात बेबंद सरकारी जमीन
(सरकारपडीत) असे शीर्षक देण्यात आले होते परंतु तरीही तेव्हा धुळ्याच्या तहसीलदार म्हणून ज्योती देवरे यांनी 03/10/2017 रोजी आदेश देऊन सोसायटी सदस्यांना बेकायदेशीरपणे जमीन मंजूर केल्याची माहिती ॲड. सरोदे यांनी दिली.
Web Title : Pune News | corruption of Rs 6 crore ! Complaint lodged with Lokayukta against Tehsildar of Parner Jyoti Deore
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mutual Funds | ते चार म्यूच्युअल फंड्स जे कमाईसह टॅक्स सेव्हिंगमध्ये सुद्धा करतात मदत, जाणून घ्या
Beed Crime | आलिशान कारने घेतला युवकाचा जीव; बीडच्या बड्या नेत्याच्या मुलाचं नाव समोर