Pune News : अखेर प्रतिक्षा संपली ! ‘कोविशिल्ड’ सिरममधून भारतातील 13 शहरांमध्ये रवाना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जगात हाहाकार माजवणाऱ्या ‘कोरोना’वर भारतातील पहिल्या वहिल्या ‘कोविशिल्ड’ (covishield ) लसीचे डोस आज (मंगळवार) पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून 5 वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळाकडे रवाना झाल्या आहेत. 3 कोल्ड स्टोरेज कंटेनर प्रथम पाठवण्यात आले आहेत. काल (सोमवार) सायंकाळी 6 कंटेनर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यामधील पहिले 3 कंटेनर आज पहाटे रवाना केले. यावेळी कंटेनरमध्ये लसीचे (covishield ) डोस भरल्यानंतर हार व नारळ फोडून पूजा करण्यात आली. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे 3 कंटेनरमधील डोस भारतातील 13 शहरात पोहचणार आहेत.

सिरम इन्स्टिट्यूटचे कर्मचाऱ्यांनी यावेळी जल्लोष करत टाळ्या वाजवून हे कंटेनर गेटमधून बाहेर काढले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावत नव्हता.

परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील तसेच हडपसर पोलीस आणि मुख्यालयातील या पहाटेपासून स्वतः येथे हजर होते. कंटेनर ठीक साडे चार वाजता गेट क्रमांक दोनमध्ये आले. यानंतर त्यांची पूजा केल्यानंतर हे कंटेनर बाहेर पडले. आता दिवसभरात एकूण उर्वरित कंटेनर हे ढोस घेऊन जाणार आहेत. हे कंटेनर मध्यप्रदेश आणि गुजरात येथे पाठवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी माध्यम, पोलीस व सिरमचे कर्मचारी आणि पदाधिकारी यांची मोठी गर्दी होती.

आज पहाटेच्या सुमारास तीन कंटेनरमधून विमानतळाच्या दिशेने नेण्यात आले कोविशील्ड लशीचे हे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये लसीचे हे डोस पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद,  गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरात हे ढोस पोहचणार आहेत. दोन कार्गो फ्लाईटमधून हे डोस नेले जाणार आहेत.