Pune News : वृत्तपत्रांची विश्वासार्हता आजही टिकून – माजी उपमहापौर निलेश मगर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  नेमकेपणाने वृत्तांकन करून समाजाची विश्वासार्हता वृत्तपत्रांनी टिकविली आहे. समाजाचा आरसा आहे. समाजाच्या सर्वस्तरातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका वृत्तपत्र करीत आहेत, असे मत माजी उपमहापौर निलेश मगर यांनी व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिन आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा एलाईटच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कोरोना कालावधी सतत कार्यरत असणाऱ्या अशोक बालगुडे, प्रमोद गिरी, दिगंबर माने, नितीन वाबळे, वसंत वाघमारे, विजय वाघमारे, विवेकानंद काटमोरे यांचा माजी उपमहापौर निलेश मगर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, यावेळी 50 रिक्षाचालकांना पार्टिशिपेंट देण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर निलेश मगर आणि नगरसेविका हेमलता मगर, रोटरी क्लबचे सचिव शालिनी भगानिया, माजी अध्यक्षा अनुजा शितोळे, अलका भारती, रुपाली पवार, निर्मला नलावडे इ. क्लब मेंबर्स उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा इलाइटच्या अध्यक्षा अर्चना गोजमगुंडे यांनी प्रास्ताविकामध्ये रोटरी क्लबच्या वतीने सतत राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. रुपाली पवार यांनी सूत्रसंचालन केले. अलका भारती यांनी आभार मानले.