Pune News : वारजे माळवाडीतील जुगार अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा, वारज्यातील अवैध ‘पुरी’भाजीचीच सर्व चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हे शाखेच्या पथकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे हद्दीत दणक्यात सुरू असलेल्या मातबर व्यक्तीच्या जुगार आड्यावर छापा सत्र राबवले. चौघांना पकडत 4 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर मात्र पोलीस दलात येथील कर्मचाऱ्याला ‘पुरी’भाजीसाठी ‘मलिदा’ मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा अवैध धंद्याना तीव्र विरोध आहे. पोलीस आयुक्त म्हणून गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भल्या-भल्यांची उचलबांगडी केली. तर आयुक्तालयात देखील असणारी ‘लाईन’ बंद केली. त्यानंतर देखील शहरात स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने छुप्या पध्दतीने अवैध धंदे सुरू आहेत. पण हे अवैध प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच दिसतात, असेच गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. अधिकाऱ्याना माहिती मिळते आणि त्यानंतर ते पथक पाठवून कारवाई करतात.

खडक, खडकीत कडक कारवाई झाल्यानंतर आज गुन्हे शाखेच्या युनिट तीनला वारजे माळवाडी येथील रामनगर परिसरात रजपूत चहा समोरील सतीश बोडके यांच्या पडीक इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नवनियुक्त पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, एकनाथ कंधारे, दीपक मते, अनिल  शिंदे, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, हनुमंत गायकवाड, प्रकाश कट्टे यांच्या पथकाने याठिकाणी कारवाई केली. येथून 40 हजार रुपयांचा ऐवज टाकत, चौघांना पकडले आहे.

दरम्यान स्थानिक पोलिसांना ‘पुरी’भाजीसाठी मलिदा मिळत असल्याने त्यांच्या आशीर्वादाने दणक्यात येथे जुगार सुरू असल्याची माहिती आहे. या कारवाईने पोलीस दलात उलट सुलट चर्चा सुरू आहे.