Pune News : हिमाचल प्रदेशातून पुण्यात चरस विक्रीसाठी आलेल्यास गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  हिमाचल प्रदेशमधून पुण्यात चरस हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून तबल साडे आकरा लाख रुपयांचे 2 किलो चरस मिळाला आहे.

वीरेंद्र घाथुराम शर्मा (वय 40, रा. जगतसुख, ता. मनाली, जि. कुल्ला, हिमाचल प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अवैध धंदे व प्रकराणा आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही शहरात अवैध प्रकार सुरूच आहेत. दरम्यान गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकाला एकजण कारमध्ये चरस घेऊन नाशिकमार्गे पुण्यात येणार आहे. त्यानुसार पथकाने खडकी परिसरात सापळा रचून महिंद्रा एक्स. यु.व्ही. गाडी पकडली. त्यात एकाला पकडले. त्याची झडती घेतली. पण त्याच्याजवळ काहीच नव्हते. मग गाडीत चेकिंग केली. त्यावेळी गाडीत चरस आढळून आला. त्याच्याकडून 1 किलो 905 ग्रॅम चरस पकडला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, राहुल उत्तरकर, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली आहे.

त्याची हुशारी पोलिसांनी ओळखली…

आरोपी शर्मा याने हे चरस हे गाडीचे बॉनेटमध्ये लपवले होते. तर गाडी कुठेही अडवू नये म्हणून त्याने 3 महिला व त्यांच्या लहान मुलांना पुणे फिरवून आणतो आणि वरून 10 हजार रुपये देतो असे खोटे बोलून आणले होते. त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हते.

हिवाळ्यात हिमाचल प्रदेशमध्ये चरसचा हंगामाच असतो. तेथे चरस सव्वा लाख रुपये किलो मिळतो. त्याची ग्राहकापर्यंत येईपर्यंत 6 लाख रुपये किलो होतो. तेथून सव्वा लाखाला घेतल्यानंतर अडीच ते तीन लाख रुपयांना एजंटला मिळतो. मग तो पुढे वाढवून 6 लाखाला मिळतो.