Pune News : पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 3 पिस्तूलासह 9 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 3 पिस्तूल व 9 काडतुसे असा मिळून 1 लाख 24 हजारांचा ऐवज जप्त केला. निलेश दत्तात्रय शिर्के (वय २९, रा. सांगवी सांडस, हवेली) व राहुल गणपत ढवळे (वय २९, रा. राहू पिंपळगाव, दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सराईत गुन्हेगारांवर वॉच ठेवला जात आहे. यादरम्यान सिंहगड रस्ता परिसरातील एका मंगल कार्यालयाजवळ दोघेजण संशयास्पद थांबले आहेत. तर त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून निलेश आणि राहूलला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 3 पिस्तूल व 9 काडतुसे मिळून आले. त्यांनी हे पिस्तुल कोठून आणले आणि कशासाठी जवळ बाळगत होते, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाहिद शेख, दिलीप जोशी, नीलेश शिवतरे, अतुल मेंगे, गणेश पाटोळे, सुमित ताकपेरे, ऋषीकेश कोळप, चेतन होळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.