Pune News : जंगली महाराज रस्त्यावर पिस्तुल घेऊन थांबलेल्या दोघा सराईतांना गुन्हे शाखेकडून अटक, 2 पिस्तुलांसह 4 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जंगली महाराज रस्त्यावर पिस्तुल घेऊन थांबलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुल व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

याप्रकरणी आदित्य रणजीत चंदेल (वय 21 रा. 33/1 जुनी ग्रामपंचायत जवळ आंबेगाव खुर्द) व दत्ता उर्फ राजेश भास्कर इंगळे (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात पाहिजे आरोपी, सराईत गुन्हेगार व अवैध धंदे करणाऱ्यावर जोरदार कारवाई सुरू आहे. दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त घालत असताना कर्मचारी सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार जंगली महाराज रस्त्यावर थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तुल आहेत. ते काही तरी गंभीर गुन्हा करणार आहेत. त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून या दोघांना पकडले. त्यांक्सही झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2 पिस्तुल व 4 काडतुसे मिळून आली. आता ते पिस्तुल कोठून आणले तसेच ते याचा वापर कुठे करणार होते याचा तपास केला जात आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी सहाय्यक फौजदार सतीश भालेकर, विजयसिंह वसावे, कर्मचारी अशोक माने, अजय थोरात, योगेश जगताप पोलीस अमलदार सचिन जाधव, इमरान शेख, अय्याज दड्डीकर, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.