Pune News : सराईत गुन्हेगाराचा खून करून मृतदेह डुक्कन खिंडीत टाकणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सराईताचा खून करत मृतदेह डुक्कर खिंडीत टाकून पसार झालेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकाने सापळा रचून अटक केली. तेजस दत्तात्रय भालेराव (वय २१ रा. खेचरे, मुळशी) आणि महेश मलिक अहिवळे (वय २३, किरकीटवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जगदीश पारधे असे खून झालेल्याचे नाव आहे.

तेेेजस भालेेराव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आलेली आहे. तर महेश हा देखील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दरम्यान 20 जानेवारी रोजी सकाळी डुक्कर खिंडीत एकाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर हा सराईत गुन्हेगार जगदीश पारध्ये याचा मृतदेह असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलोसानी तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला. परंतु यातील तेजस व महेश हे गुन्ह्यानंतर पसार झाले होते. त्यांचा शोध घेत असताना फुरसुंगी-कात्रज बायपास रस्त्याने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती दरोडा व वाहनचोरी पथकातील पोलीस नाईक धनंजय ताजणे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तेजस आणि महेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने जगदीश पारधेचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश पाटोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.