Pune News : कोंढव्यात पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कामगाराला शस्त्राचा धाक दाखवून रोकड लुटली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोंढव्यात पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कामगाराला शस्त्राचा धाक दाखवून रोकड लुटल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी राहूल डोलारे (वय २०, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील तालाब कंपनीजवळील एस. के. ऑटोकेअर पेट्रोलपंपावर डोलारे हे काम करतात. मंगळवारी मध्यरात्री पेट्रोल भरण्यासाठी गर्दी नसल्यामुळे ते जमा झालेली रोकड मोजत होते. त्यावेळी दोन तरुण दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी डोलारे यांना शस्त्राचा धाक दाखवून त्या ठिकाणी दहशत निर्माण केली. त्यांच्या हातामध्ये पेट्रोल भरल्याचे असलेले १४ हजार रूपयांची रोकड जबरदस्तीने त्यांच्या हातामधून हिसकावून नेली. अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत.