Pune : स्वयंघोषित भाई अन् त्याच्या टोळक्याकडून नेतेगिरी करणार्‍या भावंडांना बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पाटील इस्टेटमधील स्वयंघोषित भाई आणि त्याच्या टोळक्याने येथे नेतेगिरी करणाऱ्या दोन सख्या भावाना टोळक्याने बेदम मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नेते झालात का असे त्यांनी मारहाण केली आहे.

याप्रकरणी प्रमोद रुपचंद सोळखी (वय 36) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदिल जावेद शेख (वय 19) आणि अमन दस्तगिर शेख (वय 21) या दोघांना अटक केली आहे. तर इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे पाटील इस्टेट परिसरात राहणारे आहेत. दरम्यान यातील फिर्यादी व त्यांचा भाऊ प्रकाश हे रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी आरोपी टोळक्याने त्यांना येथे अडविले. तसेच तुम दोनो भाई पाटील इस्टेट के नेता हो गये क्या, तुम्हारी नेतागिरी निकलता हु, असे म्हणत आदिल याने शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर टोळक्याने फरशी व दगडाने बेदम मारहाण करत दोघा भावांच्या खुनाचा प्रयत्न केला. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.