Pune News : दत्त्वाडीमध्ये वाहनांची तोडफोड वर्षभरापासून फरारी आरोपी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाहनांची तोडफोड करून फरारी असलेल्या आरोपीला दरोडा व वाहनचोरी पथकातील पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. ही कारवाई गुरुवारी (दि. 4) अकराच्या सुमारास केली.

अभिषेक संतोष येनपुरे (वय 21, रा. राजेंद्रनगर, पीएमसी कॉलनी, दत्तवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीत वाहनांची तोडफोड करून वर्षभरापासून फरारी असलेला आरोपी पुणे-सातारा रस्त्यावरील निसर्ग हॉटेल कात्रज येथे पकडले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता फैजान मुल्ला याच्या मदतीने गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली. गुन्हा केल्यानंतर विश्रामबाग, लक्ष्मी देऊळ, पोतदार हायस्कूल, शारदानगर गल्ली, सांगली येथे पत्नीसह राहत असल्याची माहिती दिली. त्याला पुढील तपासासाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, पोलीस हवालदार उदय काळभोर, राजेश अभंगे, विनायक रामाणे, दिनकर लोखंडे, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.