Pune News : कोथरूडमधील मामासाहेब मोहोळ शाळेसमोर सराईत गुन्हेगाराकडून तरूणावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोथरूड परिसरात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराने तरुणावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मामासाहेब मोहोळ शाळेसमोर हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अमोल रमेश गोडांबे (वय 31) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाच्या आईने सविता राजेंद्रसिंग परदेशी (वय 52) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात आकाश हा तरुण जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व आकाश हे एकमेकांना ओळखतात. त्यांच्यात यापूर्वी वाद झाले होते. रविवारी (दि.14 फेब्रुवारी) मध्यरात्री फिर्यादी यांचा मुलगा आकाश हा मामासाहेब मोहोळ शाळेच्या समोर थांबला होता. यावेळी अमोल गोडांबे हा तेथे आला. त्याने पूर्वीच्या वादातून आकाश याच्याशी वाद घातला. तसेच ‘तुला आज खल्लास करीन, जीवे ठार मारणार आहे’ असे म्हणत त्याच्या डोक्यात सतूरने सपासप वार केले. त्यानंतर मोठमोठ्याने आरडा ओरड करत परिसरात दहशत माजवली. यानंतर तो तेथून पसार झाला. यात आकाश हा गंभीर जखमी झाला आहे. आकाश याच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला पकडले आहे. अधिक तपास कोथरुड पोलीस करत आहेत.