Pune News | खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आढळले 4 महिन्याचे मगरीचे पिल्लू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | येथील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Pune News) खानापूर गावातील पाणवठ्यानजदीक एक मगरीचे पिल्लं (Crocodile chicks) आढळून आलं आहे. मगरीचे पिल्लू पाण्याच्या बाहेर आल्याने निसर्गप्रेमींनी त्याला काळजीपूर्वक वनविभागाकडे (Forest Department) दिलं आहे. दरम्यान, त्या पिल्लाला आता उपचारासाठी ते राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात (Rajiv Gandhi Zoological Museum) देण्यात आले आहे. तसेच पिल्लं थोडं मोठं झाल्यानंतर ते पुन्हा पाणवठ्यात सोडलं जाणार आहे.

खानापूर परिसरातील बॅकवॉटरमध्ये मगरीचे प्रजनन होत असल्याने त्या ठिकाणी मगरींचे वास्तव्य आहे. मात्र, मगरींनी कोणावर देखील हल्ला केला नाही. तर, काही काही वर्षांपूर्वी खडकवासला धरण क्षेत्रात मगर दिसली होती. आता हे एक 4 महिन्यांचे मगरीचे पिल्लू आढळून आले आहे. या दरम्यान, ‘पीआरटी’ पथकाचे तानाजी भोसले, अक्षय जाधव, धवल तुडमवार व सूरज कवडे यांनी घटनास्थळी जाऊन त्या पिल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर व्यास संस्थेचे मनोज वाल्हेकर (Manoj Walhekar) यांनी देखील त्यांना मदत केली आहे.

मगरी एका वेळी पन्नासहून अधिक अंडी देतात, पण त्यातील सर्वच पिल्लं जगत नाहीत. त्यातील काही अंडी इतर वन्यजीव खातात किंवा काही फुटतात. जर ही पिल्लं मगरीजवळच राहिली तर ती जगतात. ती तर आईपासून दूर गेली, तर त्यांना मोठे मासे खाऊन टाकतात किंवा इतर जीव मारून टाकतात,
असे वन्यजीव बचाव पथकाचे तानाजी भोसले (Tanaji Bhosale) यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, खडकवासला धरणक्षेत्राच्या ज्या परिसरात मगरींचे वास्तव्य आहे,
तिथे सूचनाफलक लावणे आवश्यक आहे.
या मगरींचा कोणाला त्रास होत नसला तरी नागरिक त्या परिसरात जाऊ नयेत,
म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.
असं वन्यजीव संरक्षक सुनील पिसाळ (Sunil Pisal) यांनी सांगितलं आहे.

Web Titel :- Pune News | crocodile cubs found khanapur watershed pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MP Join TMC | भाजपला मोठा धक्का ! मोदी सरकार 2.0 मध्ये मंत्री राहिलेल्या BJP खासदाराचा TMC मध्ये प्रवेश

Nagpur News | नागपुरमधील बुटीबोरी येथे 50 खासगी रुग्णालये एकत्र येऊन उभारणार Oxygen प्लांट

Pune Police Recruitment | पुणे पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी ‘या’ दिवशी होणार लेखी परीक्षा